जाहिरात

Pune News : मुंबईला पळण्याचा प्लान उधळला; 6 बांगलादेशींना पुण्यातच धरलं; BSF ने केला मोठा गेम

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सहा बांगलादेशी नागरिक पुणे बंगळुरू महामार्गावर भुजबळ चौक वाकड येथून मुंबईकडे जाणार असल्याची माहिती पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट चारला मिळाली होती.

Pune News : मुंबईला पळण्याचा प्लान उधळला; 6 बांगलादेशींना पुण्यातच धरलं; BSF ने केला मोठा गेम

सुरज कसबे, प्रतिनिधी 


Pune News : पिंपरी-चिंचवड शहरात अवैधरित्या वास्तव्य करणाऱ्या सहा बांगलादेशी नागरिकांना पिंपरी-चिंचवड पोलिसांनी त्यांच्या मूळ मायदेशी बांगलादेशात पाठविल्याचं समोर आलं आहे. पुण्याच्या लोहगाव विमानतळावर या सहा जणांना सीमा सुरक्षा दल अर्थात बीएसएफ ताब्यात देण्यात आलं. बीसएफकडून या सहा जणांची विशेष विमानाने बांगलादेशात रवानगी करण्यात आली आहे.

मोहम्मद उस्मान शिराजुन अली शेख, अब्दुल्ला शागर मुल्ला, मोबिन हारून शेख, जहांगीर बिल्ला मुल्ला, मोहम्मद इलाहिन इलियाज बिश्वास आणि तोहीद मुस्लेम हसन शेख अशी बांगलादेशी नागरिकांची नावे आहेत.

Pimpri Chinchwad: गुरू-शिष्याच्या नात्याला काळिमा; शिक्षकाचे विद्यार्थिंनीसोबत वर्गातच भलते चाळे

नक्की वाचा - Pimpri Chinchwad: गुरू-शिष्याच्या नात्याला काळिमा; शिक्षकाचे विद्यार्थिंनीसोबत वर्गातच भलते चाळे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सहा बांगलादेशी नागरिक पुणे बंगळुरू महामार्गावर भुजबळ चौक वाकड येथून मुंबईकडे जाणार असल्याची माहिती पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट चारला मिळाली होती, त्यानुसार पोलिसांनी सहा जणांना सापळा लावून ताब्यात घेतले. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी सुरुवातीला उडवा-उडवीची उत्तरे दिली. त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता ते बांगलादेशी नागरिक असल्याचे पुरावे आढळून आल्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आलं. 22 जुलै रोजी त्यांच्या मायदेशी पाठविण्यात आले आहे. पुणे विमानतळावरून त्यांना गुवाहाटी येथे नेण्यात आले, तेथून पुढे बीएसएफच्या नियोजनानुसार त्यांना बांगलादेशात पाठविण्यात आले असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com