जाहिरात

Pune News : इंदापूरात खळबळ! हॉटेल 96 कट्ट्यावर पोलिसांची धाड, महिला-तरुणींसह कंडोमचे 15 पाकिट सापडले अन्..

इंदापूरच्या गागरगाव हद्दीत पुणे-सोलापूर महामार्गावरील एका हॉटेलमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळताच इंदापूर पोलिसांनी छापा टाकला.

Pune News : इंदापूरात खळबळ! हॉटेल 96 कट्ट्यावर पोलिसांची धाड, महिला-तरुणींसह कंडोमचे 15 पाकिट सापडले अन्..
Pune Indapur Crime News
पुणे:

देवा राखुंडे, प्रतिनिधी

Indapur Crime News : इंदापूरच्या गागरगाव हद्दीत पुणे-सोलापूर महामार्गावरील एका हॉटेलमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळताच इंदापूर पोलिसांनी छापा टाकत कारवाई केली आहे.या प्रकरणी हॉटेल मालकासह एजंट वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक विलास नाळे तपास करीत आहे.

पोलीस निरीक्षक विलास नाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार,इंदापूर तालुक्यातील गागरगाव हद्दीत पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल कल्याण अँग्रो परमिट रूम बियर बार ॲन्ड लॉज तसेच हॉटेल 96 कट्टा येथे स्त्रिया व मुली अनैतिक  देहव्यापार करत असल्याची गोपनीय माहिती इंदापूर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार इंदापूर पोलिसांच्या पथकाने या ठिकाणी 3 एप्रिल रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास छापा टाकून कारवाई केली.

नक्की वाचा >> Shirdi News: "माझ्या मृत्यूला कॅप्टन खरात जबाबदार", भोंदूबाबाची शिर्डीतील 4 वर्षांपूर्वीची फाईल आली समोर

पोलिसांनी एजंट महिलेची केली झाडाझडती

या कारवाईत पोलिसांनी 1000 रुपये रोख रक्कम याशिवाय पंधरा कंडोम पाकीट आणि त्या ठिकाणच्या एजंट महिलेची महिला पोलीस हवालदार यांनी  झाडाझडती घेतली असता तिच्याकडून 2000 रोख रक्कम मिळून आली.असा एकूण 3375 रुपयांचा मुद्देमाल या कारवाईत हस्तगत करण्यात आला. 

नक्की वाचा >> Akola News : अकोल्यात ‘ऑपरेशन प्रहार', गावठी-देशी दारूचा धंदा करणाऱ्यांची खैर नाही, पोलिसांचे 75 ठिकाणी छापे

याप्रकरणी महिला पोलीस  फौजदार शुभांगी खंडागळे यांच्या फिर्यादीवरून हॉटेल मालक दीपक उर्फ ज्ञानदेव सिताराम ढवळे आणि एजंट महिलेविरोधात अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम 1956 कलम 4,5 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com