आपण सोलापूरचे उपजिल्हाधिकारी आहोत. तुम्हाला अक्कलकोट इथे नोकरीला लावतो. असे आमिष दाखवून अनेकांना लाखोचा गंडा घातल्याचे समोर आले आहे. उपजिल्हाधिकारी असल्याचा बनाव करून त्याने लाखोची लुट केली आहे. मात्र शेवटी पोलिसांनी सापळा रचून या बोगस व्यक्तीला अटक केली आहे. तो त्याच्याकडे आयएएस असल्याचे खोटे ओळखपत्र ही ठेवत होता. ते ही पोलिसांनी जप्त केले आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा)
या तोतया उपजिल्हाधिकाऱ्याचे नाव पवन मारुती पांढरे आहे. त्याचे वय वीस वर्ष आहे. हा मुळचा लातूरचा आहे. बारावी पास झाल्यानंतर पवन काम धंदा करण्यासाठी अक्कलकोट येथे मावशीकडे आला होता. त्यावेळी त्याने नातेवाईकांना आपण युपीएससी परिक्षा पास झालो आहोत. सध्या सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहेत अशी खोटी माहिती दिली होती.
ट्रेंडिंग बातमी - 9 महिन्याचा चिमुकला, गळ्याला साप चावला, 20 दिवस बेशुद्ध, नंतर जे झालं ते...
शिवाय भारत सरकारच्या कार्मिक एवं प्रशिक्षण विभागात काम करत असल्याचेही पवन पांढरे ओळखपत्र घेवून वावरत होता. त्यावर आयएएस असंही लिहीलं होतं. त्यातून आपण उपजिल्हाधिकारी म्हणून काम करत असल्याचेही त्याने दाखवले होते. याचाच गैरफायदा घेवून त्यांनी अनेकांना लाखोला गंडा घातला आहे. अक्कलकोट लातूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात कामाला लावतो म्हणून तो सांगायचा. यातूनच त्याने जळवपास चाळीस लाखाची फसवणूक केली आहे.
ट्रेंडींग बातमी - निर्दयी बाप! दोन चिमुकल्या मुलींचा आधी खून केल मग नदीत फेकले
फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर संबधितांनी पोलिस स्टेशन गाठले. अक्कलकोट दक्षिण, डीबी पथकाने या विरोधात कारवाई केली. पवन पांढरे याला अटक केली. शिवाय त्याच्याकडून बनावट आयडी ही जप्त केले आहे. शिवाय त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नोकरीचं अशा पद्धतीचे आमिष कोणी दाखवत असेल तर त्याला प्रतिसाद देवू नका असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world