जाहिरात

Sangli News : मुख्याध्यापक निघाला नराधम, आश्रमशाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनीसोबत घृणास्पद कृत्य

एका मुख्याध्यापकाने अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार सांगलीच्या जत तालुक्यातील आश्रम शाळेत घडला आहे.

Sangli News : मुख्याध्यापक निघाला नराधम, आश्रमशाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनीसोबत घृणास्पद कृत्य

Sangali Crime : एका मुख्याध्यापकाने अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार सांगलीच्या जत तालुक्यातील आश्रम शाळेत घडला आहे. सनमडी येथील एका नामांकित आश्रम शाळेमध्ये हा प्रकार घडला असून या प्रकरणी आश्रमशाळेच्या मुख्याध्यापकाला उमदी पोलिसांनी अटक देखील केली आहे. विनोद जगधने असं अटक करण्यात आलेल्या मुख्याध्यापकाचं नाव आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

काही महिन्यांपूर्वी बदलापुरात शाळेत एका कर्मचाऱ्याने चौथीतील मुलीसोबत विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. त्यानंतर देशभरातून संताप व्यक्त करण्यात आला होता. त्यानंतर सांगलीतून हा भयंकर प्रकार समोर आला आहे.   

Jalgaon Crime : विवाह कार्यालयात बापाने मुलगी आणि जावयावर झाडल्या गोळ्या; जळगाव हादरलं!

नक्की वाचा - Jalgaon Crime : विवाह कार्यालयात बापाने मुलगी आणि जावयावर झाडल्या गोळ्या; जळगाव हादरलं!

18 एप्रिल रोजी सनमडीमधील एका नामांकित आश्रम शाळेत मुख्याध्यापक असणारे जगधने यांनी शाळेतील एका विद्यार्थिनीचा विनयभंग केला. त्यानंतर या मुख्याध्यापकाने पीडित अल्पवयीन मुलीला कोणास सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली होती. दरम्यान आश्रम शाळेला सुट्टी लागल्यानंतर पीडित मुलीने घरी आल्यावर आपल्या पालकांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर संतप्त पालकांनी आश्रम शाळेतल्या मुख्याध्यापकाला जाब विचारत बेदम मारहाण केली.

यानंतर हा सर्व प्रकार समोर आला होता. मात्र नामांकित आश्रम शाळा असल्याने सदरचे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. पण काही पालकांनी याबाबत आवाज उठवल्यानंतर इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडून आश्रमशाळेत चौकशी करण्यात आली आणि अखेर या प्रकरणात मुख्याध्यापकाविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. मुख्याध्यापक विनोद जगधने याला अटक देखील करण्यात आली असून या नराधम  मुख्याध्यापकाकडून आणखी मुलींचे लैंगिक शोषण केल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे. तरी याबाबत तक्रार देण्याचं आवाहन उमदी पोलिसांच्याकडून करण्यात आला आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: