
PUBG Love Story : ऑलनाईन खेळाच्या नादानं घर उद्धवस्त झाल्याच्या घटना आपण नेहमी पाहतो. या खेळांमध्ये PUBG हा खेळ चांगलाच लोकप्रिय आहे. या खेळाची एकदा चटक लागली की खेळणाऱ्याला काहीही सूचत नाही. याचे उदाहरणं अनेकदा उघड झाले आहेत. असंच एक धक्कादायक प्रकरण आता उघड झालंय. एका विवाहित महिलेला ऑनलाइन मोबाइल गेम PUBG मुळे प्रेम झाले. ऑनलाइन गेमचे व्यसन इतके लागले की त्या महिलेने आपल्या पतीचे 55 तुकडे करून त्याला ड्रममध्ये भरण्याची धमकी दिली. एवढेच नाही तर, दीड वर्षांच्या निष्पाप मुलावरही ती अत्याचार करू लागली. शेवटी, पतीने आपला आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी पत्नीला तिच्या प्रियकरासोबत जाऊ दिले.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
ऑनलाईन गेमनं कुटुंब तोडलं
ही धक्कादायक घटना बुंदेलखंडमधील महोबा येथील आहे. येथील 30 वर्षांच्या शीलू रैकवार मिठाई बनवण्याचं काम करता. त्यांचं 2022 मध्ये बांदा जिल्ह्यातल्या मटौंधमघील आराधानाशी लग्न झालं. लग्नानंतर आराधनाला ऑनलाइन गेम PUBG चे व्यसन लागले. गेम खेळता खेळता तिची ओळख लुधियाना (पंजाब) येथील शिवम नावाच्या तरुणाशी झाली आणि त्यानंतर दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले.
शीलूच्या दाव्यानुसार, तो दिवसभर दुकानात काम करत असे, तर त्याची पत्नी घरी PUBG खेळत असे. हळूहळू तिने पतीपासून अंतर ठेवण्यास सुरुवात केली आणि जाणीवपूर्वक वाद घालू लागली.
( नक्की वाचा : सोनमपेक्षाही भयंकर ऐश्वर्या ! आई-मुलीचा एकच प्रियकर, लग्नानंतर महिनाभरातच नवऱ्याचा केला राजा रघुवंशी ! )
प्रियकर घरी पोहोचला
आराधना इतक्यावरच थांबली नाही. तिनं दीड वर्षांच्या निष्पाप मुलाला मारहाण करून पतीवर खोटे अत्याचाराचे आरोप लावण्याचा प्रयत्न केला. मुलाच्या शरीरावर जखमांच्या खुना आजही आहेत. पतीने पत्नीला समजावण्याचा प्रयत्न केला असता, तिने त्याला जीवे मारण्याची धमकी दिली. आराधनाने सांगितले की, जर त्याने त्यांच्यामध्ये येण्याचा प्रयत्न केला, तर ती त्याचे 55 तुकडे करून ड्रममध्ये भरेल. घाबरलेल्या पतीने तरीही आपले नाते वाचवण्याचा प्रयत्न केला. पण काल (गुरुवार, 25 जून) अचानक 900 किमी दूरून पत्नीचा प्रियकर शिवम तिच्या घरी पोहोचला आणि त्याने खूप गोंधळ घातला.
( नक्की वाचा : तौफिकनं नेहाला गच्चीवरुन का फेकलं? बुरखा घालून का लपला ? प्रत्येक गोष्टीचा झाला खुलासा )
जीव वाचवण्यासाठी निर्णय
आराधनाने प्रियकरासोबत जाण्याचा हट्ट धरला. परिस्थिती इतकी बिघडली की शीलूने आपल्या जिवाच्या सुरक्षिततेसाठी कोतवालीमध्ये तक्रार दिली. पोलिसांनी प्रियकर शिवमवर शांतता भंग केल्याप्रकरणी कारवाई केली, परंतु आराधनाने पती आणि निष्पाप मुलाला सोडून शिवमसोबत जाण्याचा निर्णय घेतला. पती शीलूने आपल्या आयुष्यासाठी पत्नीला प्रियकरासोबत जाऊ दिले आहे. पोलीस सध्या या प्रकरणाची चौकशी करत आहेत. पीडित पतीने त्याच्या मुलासोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world