जाहिरात

Pune News : इंग्लंडमधलं घर-फार्महाऊस, मुलींसाठी सगळं मांत्रिकावर उधळलं; पुण्यातील दाम्पत्याला 14 कोटींना लुटलं

आपल्या अंगात शंकर महाराज संचारतात आणि त्यांच्या आशीर्वादाने मुलींचं आजारपण बरं करू असं आश्वासन वेदिकाने डोळस दाम्पत्याला दिलं होतं.

Pune News : इंग्लंडमधलं घर-फार्महाऊस, मुलींसाठी सगळं मांत्रिकावर उधळलं; पुण्यातील दाम्पत्याला 14 कोटींना लुटलं

रेवती हिंगवे, प्रतिनिधी

Pune Crime News : भोंदूबाबाच्या नादाला लागून पुण्यात उच्चशिक्षित दाम्पत्याने सर्वस्व गमावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या भोंदूबाबाने पुण्यातील दाम्पत्याची (Pune Couple robbed of Rs 14 crores by Bhondu Baba) फसवणूक करीत तब्बल 14 कोटी रुपयांचा गंडा घातला. यामध्ये   दाम्पत्याला इंग्लंडमधील घर आणि फार्महाऊसही विकायला लावलं. दोन्ही मुलींना बरं करण्याचं आश्वासन देतं या भोंदूबाबाने दाम्पत्याला अक्षरश: देशोधडीला लावलं. 

काय आहे प्रकरण? 

एका मांत्रिक महिलेने पुण्यातील आयटी इंजिनीयरची तब्ब्ल १४ कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. यामध्ये वेदिका पंढरपूरकरसह एका भोंदू बाबाचाही समावेश आहे. दिपक डोळस IT इंजिनियर आहेत. मुलींसाठी त्यांनी  कशाचाही विचार केला नाही आणि भोंदूबाबा आणि वेदिकाच्या मागणीनुसार पैसे पुरवित राहिले. डोळस यांच्या मुलींना जन्मजात आजार आहे. आजार बरा करण्याच्या नावाखाली त्यांची १४ कोटींची लूट करण्यात आली आहे.  आपल्या अंगात शंकर महाराज संचारतात आणि ते दीपक डोळस यांच्या दोन मुलींना असलेले दुर्धर आजार बरे  करतील असं सांगून वेदिका पंढरपूरकर यांनी ही फसवणूक केली आहे. या सगळ्या प्रकरणात डोळस दाम्पत्याने आता पुणे पोलीस आयुक्तांना पत्र देत दाद मागितली आहे. 

Pune News : पुण्यात राहिली, संसार थाटला; मात्र एक चूक नडली; महिलेला मायदेशी पाठविण्याची प्रक्रिया सुरू

नक्की वाचा - Pune News : पुण्यात राहिली, संसार थाटला; मात्र एक चूक नडली; महिलेला मायदेशी पाठविण्याची प्रक्रिया सुरू

आपल्या अंगात शंकर महाराज संचारतात...

वेदिका पंढरपूरकर दाम्पत्याला वेळोवेळी गंडा घालत होती. आपल्या अंगात शंकर महाराज संचारतात आणि त्यांच्या आशीर्वादाने आपण डोळस दाम्पत्याच्या दोन मुलींना असलेले जन्मजात आजारपण बरे करू असं सांगत त्यांना १४ कोटींना गंडा घातला आहे. त्यासाठी दीपक डोळस यांना एक एक करत त्यांच्या सगळ्या मालमत्ता या मांत्रिक महिलेने विकायल्या लावल्या. त्यांनी इंगलंडमधील त्यांचं घरदेखील विकलं आहे. त्यातून मिळालेले पैसे वेदिका पंढरपूरकरने स्वतःच्या खात्यावर वळते करून घेतले. त्या पैशातून वेदिका पंढरपूरकरने कोथरूडच्या महात्मा सोसायटीत आलिशान बंगला खरेदी केला आहे. 

आरोपी भोंदू बाबा आणि वेदिका पंढरपूरकर

आरोपी भोंदू बाबा आणि वेदिका पंढरपूरकर

पुण्यातील कोथरूड भागात वास्तव्य असलेल्या या दाम्पत्याची एका भजनी मंडळाच्या माध्यमातून राजेंद्र खडके या भोंदू बाबासोबत भेट झाली. या बाबाने वेदिका पंढरपूरकर या त्याच्या शिष्येच्या अंगात शांकर महाराज संचारतात असं सांगून शंकर महाराज तुमच्या मुलींचे आजार बरे करतील असं आश्वासन दिलं आणि याच आश्वासनाला बळी पडून या दांपत्याने आपल सर्वस्व गमावलं आहे. दरम्यान या संदर्भातील अनेक व्हिडिओ समोर आले आहेत. यामध्ये दाम्पत्य भोंदू बाबाची देवाप्रमाणे आरती करताना दिसत आहेत. या अंधश्रद्धेतून दाम्पत्याची मोठी फसवणूक झाली आहे. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com