जाहिरात

Pune News: अरे पुण्यात चाललंय काय? विकृत नराधमाचा श्वानावर अत्याचार, घटना CCTV मध्ये कैद

गेल्या काही काळापासून तो हडपसरमधील हांडेवाडी परिसरात राहातो. श्वानाचा मालक कामा निमित्त काही दिवसांसाठी बाहेरगावी गेला होता.

Pune News: अरे पुण्यात चाललंय काय? विकृत नराधमाचा श्वानावर अत्याचार, घटना CCTV मध्ये कैद
प्रतिकात्मक फोटो
पुणे:

पुण्यात दिवसेंदिवस अतिशय वाईट घटना घडत आहे. एक सांस्कृतीक शहर आणि विद्येचे माहेरघर असलेल्या या शहरात विकृतीचा कळस गाठल्याच्या काही घटना समोर आल्या आहेत. मग ती शिवशाही बसमध्ये झालेली अत्याचाराची घटना असो की श्रीमंताच्या लेकाने सर्वां समोर लघवी करण्याचा प्रकार असो. पोर्शे कार अपघात अजून पुणेकर विसरलेले नाहीत. कुठे खून तर कुठे अत्याचार, त्यात आता आणखी एका खळबळजनक आणि तितकाच किळसवाणा प्रकार पुण्यात घडला आहे. त्यामुळे सर्वच जण हादरून गेले आहे. त्यामुळे  पुण्यात नेमकं चाललंय तरी काय असा प्रश्न पडला आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

ही धक्कादायक घटना पुण्यातील हडपसरमध्ये घडली आहे. इथं एका विकृत तरूणाने चक्क एका श्वानावरच अत्याचार केला आहे. ही सर्व किळसवाणा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. या प्रकरणी काळेपडळ पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी हलीमुद्दीन शेख याला अटक करण्यात आली आहे. तो मुळचा पश्चिम बंगालचा आहे. तो कामा निमित्त पुण्यात आला होता. 

ट्रेंडिंग बातमी - School news: 'शाळेत शिवी द्याल तर या पुढे...', काय आहे 'शिवी मुक्त शाळा' अभियान?

गेल्या काही काळापासून तो हडपसरमधील हांडेवाडी परिसरात राहातो. श्वानाचा मालक कामा निमित्त काही दिवसांसाठी बाहेरगावी गेला होता. ज्या वेळी घरमालक परत आला त्यावेळी त्या श्वानाच्या वागण्यात वेगळेपण जाणवले. पहिल्या सारखी सहजता त्या श्वानामध्ये नव्हती. शंका आल्यामुळे त्याने घरातील सीसीटीव्ही फुटेज चेक केले. ते पाहिल्यानंतर त्यांना धक्काच बसला.  हा अमानवी आणि किळसवाणा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला होता. 

ट्रेंडिंग बातमी - Konkan News: 'उद्धव ठाकरे कोकणात येतील तेव्हा कोंबडी-वडे, माशांची हॉटेल बंद ठेवा' कुणी दिले आदेश?

आरोपी हलीमुद्दीन शेख हा फुटेजमध्ये श्वानावर अत्याचार करताना दिसत आहे. ही बातमी वाऱ्या सारखी परिसरात पसरली. त्यानंतर संतापाची लाट उसळली आहे. याबाबत शिवसेनेचे पदाधिकारी राजेश पळसकर यांच्यासह इतर स्थानिक नागरिकांना याची माहिती मिळाली. त्यांनी तात्काळ याबाबत स्थानिक पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी ही तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली आहे. शिवाय  पुढील तपास सुरू असल्याची माहिती मिळत आहे.