
लोकसभे पाठोपाठ विधानसभेतही ठाकरेंना कोकणात फटका बसला. कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता. पण शिवसेनेत फुट पडल्यानंतर कोकणावरची ठाकरेंची पकड ढिली झाल्याचे दिसत आहे. कोकणातून एकही खासदार निवडून आला नाही. तर विधानसभेला केवळ भास्कर जाधव यांच्या रुपाने एकच आमदार निवडून आला.त्या तुलनेत शिवसेना शिंदे गटाला मोठं यश मिळालं आहे. भाजपने ही आपले पाय रोवले आहेत. अशा स्थिती आता ठाकरे गटाने मिशन कोकण हातात घेतलं आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मिशन कोकण अंतर्गत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे कोकणचा दौरा करणार आहेत. त्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यातून कोकणी माणसाशी ते संवाद साधणार आहेत. नेते सोडून गेले पण शिवसैनिक आपल्या बरोबरच असल्याचा दावा ठाकरेंनी केला. या पार्श्वभूमीवर ते आता कोकण दौरा करणार आहेत. यातून ते प्रत्येक मतदार संघात जातील. संघटना बांधणीकडे लक्ष देतील. शिवाय पक्षा नव्या चेहऱ्यांना संधी ही देतील. नवं नेतृ्त्व कोकणात उभारलं जाण्याचा प्लॅन ठाकरेंनी केला आहे.
पण त्यांच्या या कोकण दौऱ्यावर भाजप खासदार नारायण राणे यांनी जोरदार टीका केली आहे. उद्धव ठाकरे कशाला कोकणात येत आहेत? असा प्रश्न त्यांन केला आहे. अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना त्यांनी कोकणासाठी काय केलं? किती निधी त्यांनी कोकणासाठी दिला असा प्रश्न राणे यांनी विचारला आहे. जर तुमच्याकडे आकडे नसतील तर मी तुम्हाला किती निधी दिला त्याचे आकडे देतो असे राणे म्हणाले. शिवाय ठाकरे हे कोकणात फक्त कोंबडी वडे आणि मासे खाण्यासाठी येतात असा आरोप ही त्यांनी केला.
त्यामुळेच कोकणातल्या सर्व कोंबडी वडे आणि माशांच्या हॉटेलवाल्यांना सांगितलं आहे, ज्या दिवशी उद्धव ठाकरे कोकणात येतील त्यावेळी कोंबडी वडे, मासे बंद ठेवा. असे आदेश दिल्याचे ही त्यांनी सांगितले. ते फक्त तेच खाण्यासाठी इथं येतात असं ही राणे यावेळी म्हणाले. दरम्यान चिरीचे विमानतळ बंद होणार नाही असे आश्वासन ही त्यांनी दिले. चिपीला आता इंडिगो विमान येणार आहे असं ही ते म्हणाले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून विमान देशात वेगवेगळ्या ठिकाणी जाईल, यासाठी माझा प्रयत्न आहे. लोकांनी प्रवास करावा, उद्योगधंदे वाढवेत यासाठी माझा प्रयत्न असल्याचे खासदार नारायण राणे यांनी यावेळी सांगितले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world