
रेवती हिंगवे, प्रतिनिधी:
Pune News Private University Duped For 2 Crore: पुण्यातील कोथरुड परिसरातील एका नामांकित खासगी विद्यापीठाची अडीच कोटी रुपयांना फसवणूक केल्याप्रकरणी पुणे पोलिसांच्या सायबर ब्रांचने हैदराबाद येथे सापळा रचून तरुणाला अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपी तरुण हा उच्चशिक्षित असून, परदेशातून पदव्युत्तर पदवी आणि पीएचडीचे शिक्षण घेतलेला आहे.
इतकेच नव्हे, तर केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतही तो दोन वेळा मुलाखतीच्या टप्प्यापर्यंत पोहोचला आहे. सितैया किलारु, रा. याप्रल, हैदराबाद, असे 34 वर्षीय आरोपीचे नाव असून विशेष म्हणजे हा आरोपी उच्चशिक्षित आहे. IIT मुंबई या शिक्षण संस्थेकडून AI संबंधित शैक्षणिक प्रकल्प देण्याच्या पाहण्याने या आरोपीने ही फसवणूक केली आहे.
Pune News: पुण्यातील ससून रुग्णालयात मनोरुग्णाची आत्महत्या, 11 व्या मजल्यावरून उडी घेत संपवलं आयुष्य
सरकारच्या कृत्रिम बुद्धिमत्ता आणि ‘ड्रोन' विषयक प्रकल्पाचा करार करण्याचे आश्वासन देऊन वारंवार दूरध्वनी आणि ईमेलद्वारे संपर्क साधला. संबंधित प्रकल्पासाठी आरोपीने खासगी विद्यापीठाकडून टप्प्याटप्याने एकूण दोन कोटी 46 लाख रुपये घेतले. मात्र, आरोपी करारासाठी न आल्याने आपली फसवणूक झाल्याचे विद्यापीठाच्या लक्षात आले, त्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार दिली होती.
सितैया किलारु अस फसवणूक केलेल्या आरोपीचे नाव ‘आयआयटी' मुंबईतील प्राध्यापक असल्याचं भासवत आरोपीने 2.5 कोटी रुपयांना गंडवलं आहे..आरोपीकडून पोलिसांनी 49 लाख 75 हजार रुपयांचा मुद्देमाल सायबर पोलिसांनी जप्त केले असून यात दहा बँकांचे एटीएम कार्ड, तेरा पासबुक, पंधरा चेकबुक, सिमकार्ड, कम्प्युटर, मोबाइल, टॅब, दागदागिने, सोने खरेदी पावत्या; तसेच 48 लाख रुपये किमतीच्या दोन कार असा मुद्देमालाचा समावेश असून या आरोपीवर याआधी देखील फसवणुकीचे 8 ते 10 गुन्हे दाखल आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world