
पत्नी बेपत्ता होती म्हणून तीला शोधण्यासाठी तो बीडवरून पुण्यात आला. दोन दिवसानंतर ही तीचा शोध काही लागला नाही. अखेर घरी तो ज्या बेडवर झोपत होतात त्याच बेडखाली त्याचा पत्नीचा मृतदेह आढळून आला. ही धक्कादायक घटना घडली आहे पुण्याच्या फुरसुंगी इथे. याघटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे. पत्नीची हत्या कशी आणि कुणी केली हे पतीला समजायला मार्ग नाही. पोलिसही आता याचा तपास अधिक वेगाने करत आहेत. त्यासाठी त्यांच्या हाती आता काही सीसीटीव्ही फुटेज लागले आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पुण्यातील फुरसुंगी इथं एक धक्कादायक घटना घडली आहे. इथं उमेश पवार हे आपली पत्नी स्वप्नाली हिच्या बरोबर राहत होते. उमेश हे टॅक्सी ड्रायव्हर आहेत. त्यामुळे ते भाडी घेवून शहरा बाहेरही जात असतात. शनिवारीही ते बीड इथं गाडी घेवून गेले होते. त्यावेळी त्यांनी आपल्या पत्नीला फोन केला. पण त्यांनी काही फोन उचलला नाही. काही वेळांनी त्यांनी पुन्हा फोन केला. पण कोणताच प्रतिसाद त्यांच्या पत्नीकडून आला नाही. नंतर तो फोन ऑफही झाला.
ट्रेंडिंग बातमी - 'मी काय म्हातारा झालोय का? 84 वर्षाचे शरद पवार असं का म्हणाले?
उमेश यांनी त्यांच्या मित्राला फोन केला. आपल्या घरी जावून बघून ये असं सांगितलं. त्यांचा मित्र घरी गेल्यावर त्यांची पत्नी स्वप्नाली तिथे दिसली नाही. त्यानंतर उमेश हे तातडीने पुण्याकडे निघाले. रात्री ते पुण्यात पोहोचले. त्यांनी पत्नीच शोधाशोध केली. पण काही पत्ता लागला नाही. त्यांनी याबाबत पोलिसात तक्रारही केली. नंतर ते घरी येवून झोपले. दोन दिवस ते पत्नीचा शोध घेत होते पण काही पत्ता लागला नाही.
ट्रेंडिंग बातमी - आक्रीत घडलं! ठाकरे सेनेनं चक्क भाजप उमेदवाराला दिला पाठिंबा? कुठे घडलं?
घरी बसले असताना त्यांना पत्नीच्या काही गोष्टी घरात नसल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी घरात शोधाशोध सुरू केली. त्यात त्यांनी सोफाकम बेड असलेला सोफा उघडला. त्यानंतर त्यांना धक्काच बसला. त्यांच्या पत्नीचा मृतदेह त्या बेडच्या आत ठेवण्यात आला होता. त्याच बेडवर उमेश हे गेले दोन दिवस झोपत होते. त्यांनी मृतदेह पाहील्यानंतर तातडीने पोलिसांना कळवले. पोलिस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी तपास केला. शिवाय घरातील फिंगरप्रिटही घेतले.
हत्या झालेल्या स्वप्नाली उमेश पवार यांचे वय केवळ 24 वर्ष होतं. त्यांचा मृतदेह घरातल्या बेडच्या बॉक्समध्येच ठेवण्यात आला होता. त्यांचे शवविच्छेद आणि पुढील तपासात करण्यात आल्या. त्यात स्वप्नाली हिचा गळा आवळून खून करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. शिवाय तीच्या मानेवर नखाचे ओरखाडेही आढळून आले आहेत.या प्रकरणी आता पोलिस सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. त्यातून काही तरी धागेदोरे हाती लागतील अशी पोलिसांना अपेक्षा आहे. त्यानुसार फुरसुंगी पोलिस कारवाई करत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world