
सूरज कसबे
कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी अधिवेशनात ऑनलाईन रमी गेम खेळल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. त्यानंतर त्यांच्यावर सर्वच स्तरातून टीका होत आहे. त्यांच्या राजीनाम्याची मागणी ही होत आहे. या प्रकरणानंतर ऑनलाईन रम्मीची चर्चा जोरदार होत आहे. पण याच ऑनलाईन रम्मी गेमचं व्यसन अनेक तरुणांना लागलं आहे. या व्यसनापोटी अनेक जण कर्जबाजारी झाले आहेत. त्यात त्यांचं आयुष्यच बरबाद होत असल्याचं समोर येत आहे. असचं एक प्रकरण आता समोर आलं आहे.
या ऑनलाईन रम्मी गेमपोटी कित्येकांनी आपली शेतजमीन गहाण ठेवल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्या पैकीच एक तरूण आहे जय जाधव. हा जय सोलापूर जिल्ह्यातील करमाळ्याचा रहीवाशी आहे. या जयने या ऑनलाईन रम्मी पोटी स्वत:च्या डोक्यावर तब्बल 84 लाखांचं कर्ज करून घेतलं आहे. रम्मीच्या नादात त्याचं आयुष्य उध्वस्त झालं आहे. तो अवघ्या 26 वर्षांचा आहे. पण या व्यसनाने त्याला रस्त्यावर आणलं आहे.
नक्की वाचा - Javed Sheikh: काम ड्राव्हरचं, घर पत्र्याचं, तरही 500 कोटीचा मालक, कोण आहे जावेद शेख?
या पठ्ठ्याचे रम्मी खेळण्यासाठी केलेले कारनामे ऐकले तर तुम्ही ही तोंडात बोट घातल्या शिवाय राहाणार नाही. त्याने पिंपरी चिंचवडमध्ये रिअल इस्टेटच्या व्यवसायातून 23 लाख उभे केले होते. ते ही त्याने याच गेममध्ये उडवले. त्यातून त्याचं भागलं नाही म्हणून त्याने मित्रांकडून 20 लाखांचं कर्ज घेतलं. ते पैसे ही त्याने असेच उडवले. मग गावाकडे करमाळा येथील दीड एकर शेती गहाण ठेवली. जोडीला घरी असलेली स्कॉर्पिओ गाडी ही गहाण ठेवली.
त्यातून त्याला 20 लाखांचं कर्ज मिळालं. असं नाही म्हटलं तरी रम्मीच्या आहारी गेलेल्या जयच्या डोक्यावर जवळपास 84 लाखांचं कर्ज झालं. आज कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा अधिवेशनात ऑनलाईन रमी खेळतानाचा व्हिडीओ पाहून जयने देखील खंत व्यक्त केली आहे. मंत्र्याचा व्हिडीओ पाहून कोणीही चुकीची प्रेरणा घेऊ नका, माझं झालं तेवढं नुकसान पुरे आहे. आता आहे तिथं थांबा, असं आवाहन जयने केलं आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world