Pune News: पुण्यासह महाराष्ट्रातील काही भागांमध्ये सध्या बिबट्यांच्या हल्ल्यामुळे दहशत निर्माण झालीय. नवा मोदीखाना भागात कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या महर्षी अण्णासाहेब शिंदे शाळेबाहेर सोमवारी (24 नोव्हेंबर 2025) रात्री बिबट्या फिरत असल्याचा एआय फोटो व्हायरल होत आहे. यामुळे स्थानिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झालंय. रिपोर्ट्सनुसार या परिसरात बिबट्या आलाच नसल्याची माहिती आहे. पण सोशल मीडियावर असे फोटो जाणीवपूर्वक अपलोड करून भीती पसरवलीय जात असल्याचंही म्हटलं जातंय.
पोलिसांनी केले मोठे आवाहन | AI Image Of Bibtya Roaming In Pune Camp Area
बिबट्याच्या व्हायरल एआय फोटोमुळे परिसरात खळबळ उडाल्याने लष्कर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिरीष दिघावकर यांनी स्थानिकांना आवाहन केलंय की, "अफवांवर विश्वास ठेवू नका तसेच असे फोटो व्हायरलही करू नका".
"अफवा पसरवणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई करणार आहे. सध्या व्हायरल झालेले फोटो कोणी तयार केले आणि कोणत्या मोबाइलमधून व्हायरल केले, याचा तपास सुरू आहे", असेही वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिरीष दिघावकर सांगितलं.
बिबट्या गेला कुठे? | Pune Bibtya News In Marathi
दरम्यान तीन दिवसांपूर्वी गणेशखिंड रोड परिसरात बिबट्या फिरत असल्याचे दृश्य सीसीटीव्हीमध्ये कैद झालं होतं. पण तेथून पुढे बिबट्या कुठे गेला, याचा शोध वन अधिकाऱ्यांना अद्याप लागलेला नाही. पण हाच बिबट्या वेगवेगळ्या भागात वावरत असल्याच्या अफवा पसरवल्या जात आहेत.
अफवांच्या आधारावर अन्य गुन्हे घडण्याची भीती
मध्यरात्री किंवा पहाटेच्या वेळेस बिबट्या फिरत असल्याच्या अफवा मोठ्या प्रमाणात लष्कर भागात सध्या पसरल्या आहेत. याचाच फायदा घेऊन चोऱ्या, दरोडे यासारखे अन्य गुन्हे घडू शकतात, अशी भीतीही स्थानिक व्यक्त करत आहेत.
(नक्की वाचा: Pune News: पुणेकरांच्या भीतीत वाढ, आता पुणे एअरपोर्ट परिसरात शिरकाव! कडेकोट सुरक्षेसह स्थानिकांसाठी अलर्ट जारी)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world
