मेहबूब जमादार, रायगड:
Raigad Crime News: रायगड जिल्ह्यामधून एक हादरवणारी बातमी समोर आली आहे. रायगडच्या खोपोली शहरात आज सकाळी एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. शिवसेना (शिंदे गट) पक्षाच्या नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांची अज्ञात हल्लेखोरांनी निर्घृण हत्या केली. आज सकाळी सात वाजेच्या सुमारास ही घटना घडली असून, या घटनेमुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
नवनिर्वाचित नगरसेवकाच्या पतीची हत्या
मिळालेल्या माहितीनुसार, मंगेश काळोखे हे आज सकाळी आपल्या मुलाला शाळेत सोडून दुचाकीवरून घरी परतत होते. यावेळी दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला चढवला. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोर हे काळ्या रंगाच्या एका गाडीतून आले होते. त्यांनी मंगेश काळोखे यांना अडवून त्यांच्यावर धारदार शस्त्रांनी वार केले. या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
Mumbai Crime : डेटिंग ॲपवर भेटली, लग्नाचं स्वप्न दाखवलं आणि 53.30 लाखांना गंडा घालून 'ती' गायब
नुकत्याच झालेल्या निवडणुकीत मानसी काळोखे यांनी शिवसेना शिंदे गटाकडून विजय मिळवला होता, त्यामुळे या हत्येमागे राजकीय वैमनस्य आहे की अन्य काही कारण, याचा तपास पोलीस करत आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. हल्लेखोर घटनेनंतर फरार झाले असून, पोलिसांनी शहराबाहेर जाणाऱ्या सर्व रस्त्यांवर नाकेबंदी केली आहे.
Instagram Friend बनला हैवान! भररस्त्यात तरुणीसोबत केले अश्लील चाळे, पाहा VIDEO
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world