उत्तर प्रदेशातील संभल जिल्ह्यात जामा मशिदीत सर्व्हेक्षणावरुन झालेल्या वादानंतर परिसरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. यादरम्यान झालेल्या हिंसाचारात मृतांची संख्या पाचपर्यंत पोहोचली आहे. जिल्ह्यात इंटरनेटवरही निर्बंध आणले आहेत. दुसरीकडे समाजवादी पक्षाच्या खासदाराविरोधात केस दाखल झाल्यानंतर देशभरातील विरोधी पक्ष नेत्यांनी विरोध दर्शविला आहे.
नक्की वाचा - Sukma Encounter : छत्तीसगडमध्ये पोलीस-नक्षलवाद्यांमध्ये चकमक, 10 नक्षलवादी ठार; मोठा शस्त्रसाठा जप्त
आता या प्रकरणात आरएसएसची एन्ट्री झाली आहे. संघाचे नेता इंद्रेश कुमार यांनी समाजवादी पक्षावर मोठा आरोप केला आहे. त्यांनी उत्तर प्रदेशातील संभलमध्ये झालेल्या दंगलीसाठी सपाला दोषी ठरवलं आहे. ते म्हणाले की, समाजवादी पक्ष निवडणुकीत अपयशी ठरली यासाठी त्यांनी संभलमध्ये दंगल घडवली.
संभलच्या वादग्रस्त जामा मशिदीच्या प्रबंधन समितीने रविवारी मशीद परिसराच्या सर्व्हेक्षणादरम्यान भडकलेल्या हिंसाचारासाठी स्थानिक प्रशासनाला जबाबदार ठरवत सोमवारी सांगितलं की, मशिदीत खोदकाम केलं जात असल्याची अफवा पसरल्यानंतर जमाव एकत्र आला. मशीद प्रबंधन समितीने पत्रकार परिषदेत हिंसाचार प्रकरणात स्थानिक प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत.
ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी संभल हिंसाचारात मारले गेलेल्या तरुणांबद्दल म्हटलं की, त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला नाही, तर हत्या केली आहे. न्यायाधीशांकडून याचा तपास करवून घ्यायला हवा. ओवैसी पुढे म्हणाले, सर्व्हेक्षणापूर्वी मशिदीच्या व्यवस्थापकांना कोणतीही सूचना देण्यात आली नव्हती. पोलिसांची ही जबाबदारी होती, मात्र त्यांनी व्यवस्थापकांना याबद्दल सांगितलं नाही आणि परिसरात हिंसा उफाळली.
नक्की वाचा - मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार, 2 मंत्री आणि 3 आमदारांच्या घरावर हल्ला
संभलमधील शाही मशीद ज्या गल्लीत आहे, तेथे शांतता पसरली आहे. घरांना टाळं लावण्यात आलं आहे. संभल तहसीलमध्ये इंटरनेट निर्बंध दोन दिवसांसाठी वाढवण्यात आला आहे. मंगळवारीही इंटरनेट बंद राहील. सोमवारीही शाळा बंद ठेवण्यात
आल्या होत्या.
उत्तर प्रदेशातीस संभलमध्ये झालेल्या वादानंतर पोलिसांनी आमदार इक्बाल महमूदचे पूत्र सोहेल इक्बालच्या विरोधात एफआयआर दाखल केली आहे. सोहेल इक्बाल यांनी सोमवारी संभल प्रकरणात आयएएनएसशी बोलताना आपण निर्दोष असल्याचं सांगितलं.
संभल हिंसाचार प्रकरणात दाखल केलेल्या एफआयआरनुसार, हिंसाचाराच्या दोन दिवसांपूर्वी शुक्रवारी जुम्मेचा नमाज असताना खासदार जिया ऊर रेहमान बर्फ यांनी जामा मशिदीत जाऊन जमावाला भडकवण्याचं काम केलं. जिया-ऊर-रेहमान बर्क यांनी १९ नोव्हेंबर रोजी कोर्ट कमिश्नर सर्व्हेक्षणावरुन परिसरातील सर्वसामान्य लोकांना ही मनमानी असल्याचं सांगितलं होतं.
संभलमध्ये झालेला हिंसाचार आणि पाच जणांच्या मृत्यूवरुन मुरादाबादचे कमिश्नर आंजनेय सिंह यांनी धक्कादायक दावा केला आहे. मृतांच्या शरीरात देशी बंदुकीची काडतुसे सापडली आहेत. याशिवाय पॉइंट ब्लॅक रेंजवरुन गोळी झाडण्यात आली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world