
शरद सातपुते, सांगली: वर्षभरापूर्वी घरच्यांचा विरोध डावलून प्रेमविवाह केलेल्या नवविवाहितेने सासरच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सांगली जिल्ह्यातील इश्वरपूर येथे ही मन सुन्न करणारी घटना घडली. अमृता गुरव असे आत्महत्या केलेल्या नवविवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी पती ऋषिकेश, सासू सासरे, व ननंद यांच्यावर इश्वरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. (Sangli Married Women Death Crime News in Marathi)
समोर आलेल्या माहितीनुसार, 26 डिसेंबर 2024 रोजी ऋषिकेश व अमृताचा प्रेमविवाह झाला होता. लग्नानंतर काही महिन्यात पती ऋषिकेश आणि सासर्यांचे लोक हे सासू अनुपमा यांच्या आजारपणासाठी माहेर होऊन दोन लाख रुपये आणावेत, यासाठी त्रास देत होते. तिला मारहाण करून मानसिक छळ करीत होते. पती ऋषिकेश हा मारहाण करत होता.
Palghar News: अल्पवयीन मुलीची विक्री करून जबरदस्तीने लग्न, नवऱ्यासह 6 जणांवर गुन्हा दाखल
सासू आणि नणंद वारंवार अपमान करत होते. मामा नंदकिशोर हा ऋषिकेश याला तू अमृताला सोडून दे तुझं आपल्या जातीतील मुलीशी लग्न लावून देतो म्हणून अमृताला मानसिक त्रास देत होता. सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या सततच्या त्रासाला कंटाळून अमृता हिने शुक्रवारी सायंकाळी विषारी द्रव प्राशन केले. त्यानंतर तिला इस्लामपूर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
हा प्रकार समजतात अमृताचे आई-वडिलांनी रुग्णालयात धाव घेतली. तिथे अमृताने घडलेली सर्व प्रकार आई-वडिलांना सांगितला. तिची प्रकृती बिघडल्याने तिला कोल्हापूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र रविवारी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला आहे. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून दोषींवर कडक कारवाईची मागणी मृताच्या कुटुंबियांनी केली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world