जाहिरात

Crime News: 'कचऱ्याच्या कंत्राट'चा वाद, बेछुट गोळीबार, हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी एक अटकेत

नवी मुंबई मधील एपीएमसी मार्केट मध्ये दिवसाला मोठ्या प्रमाणात करोडोची आर्थिक उलाढाल होत असते. या मार्केटमध्ये बऱ्याच ठिकाणी बेकायदेशीर धंदे सुद्धा चालू आहेत.परंतु पोलीस मात्र दुर्लक्ष करत आहेत

Crime News: 'कचऱ्याच्या कंत्राट'चा वाद, बेछुट गोळीबार, हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी एक अटकेत

नवी मुंबई: नवी मुंबईमधील सानपाडा येथे कृषी उत्पन्न बाजार समितीचे कंत्राटदार राजाराम टोके यांच्या गोळीबार प्रकरणातील आरोपी संतोष गवळीला पुण्यामधून अटक करण्यात आली  असून त्याच्यावर 302 चा गुन्हा दाखल आहे. धक्कादायक बाब म्हणजे  संतोष गवळी हा अगोदरपासूनच गुन्हेगार प्रवृत्तीचा असल्याचं समोर आलं असून या गोळीबाराचे कारणही आता स्पष्ट झालं आहे.

काय आहे प्रकरण?

नववर्षाच्या सुरुवातीलाच  नवी मुंबईतील गजबजलेल्या परिसरात भरदिवसा गोळीबार झाला होता. सकाळची दहाच्या  सानपाडा डी मार्ट च्या समोर ही घटना घडली होती. अज्ञात दोन व्यक्तींनी युनिकॉन बाईक वरती येऊन तोंडाला रुमाल बांधून राजाराम टोके चहा पीत असताना त्यांच्यावर अंदाधुंद सहा गोळ्या झाडण्यात आल्या.  गोळीबार करून अज्ञात आरोपीतून फरार झाले. 

 एका चहाच्या दुकानात असलेल्या कॅमेऱ्यामध्ये ही सगळी घडलेली घटना ऑडिओ व्हिडिओसहित कैद झाली होती.  या हल्ल्यामध्ये राजाराम टोके यांना 4 गोळ्या लागल्या होत्या सुदैवाने चार गोळ्या लागूनसुद्धा राजाराम टोके हे वाचले आहेत. ते सध्या नवी मुंबई वाशी येथील एमजीएम हॉस्पिटल येथे ऍडमिट असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

हत्येचे धक्कादायक कारण:

नवी मुंबई पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संतोष गवळी राजाराम टोके यामध्ये पालेभाज्यांच्या कचरा कॉन्ट्रॅक्ट करून जुना वाद सुरू होता. हिरव्या भाजीपाल्यांच्या कचऱ्यामधून मिळणारा पैसा हा मोफतचा पैसा होता. हिरवा पालेभाज्यांच्या कचऱ्यांमधून मिळणारे उत्पन्न हे दिवसाला 50 ते 60 हजार रुपयांचे होतं. महिन्याचे उत्पन्न पाहिलं तर 15 ते 20 लाख रुपये होते.

 हा हिरवा पालेभाज्यांचा कचरा गौ शाळा, तबेला, या ठिकाणी विक्री केला जातो. दिवसाला 20 ते 30 ट्रक भरून हिरवा पालेभाज्यांचा कचरा एपीएमसी मार्केट मधून बाहेर जातो.  हा पालेभाज्यांचा कचरा उचलण्यासाठी रोज 40 ते 50 कामगार लागतात. त्यामुळे एपीएमसी मार्केटमध्ये या विषयावर आधीपासूनच बरेच वादविवाद सुरू होते. हे कॉन्ट्रॅक्ट आपल्याला मिळावे म्हणून संतोष गवळी आणि त्याच्या साथीदारांनी मिळून आरटीआय कार्यकर्ता राजाराम टोके यांना संपवण्याचा निश्चय केला.

नक्की वाचा - BJP News : रवींद्र चव्हाण यांची भाजपच्या महाराष्ट्र कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

या प्रकरणातील आरोपी संतोष गवळी हा गुन्हेगारी वृत्तीचा असल्याचेही समोर आलं आहे. तपासादरम्यान पोलिसांना त्याची ओळख इम्रान कुरेशी, एक कुख्यात गुन्हेगार आणि डीके राव टोळीचा माजी सदस्य, एकेकाळी गँगस्टर छोटा राजनचा माजी साथीदार म्हणून समजली. नवी मुंबईतील कळंबोली येथील रहिवासी असलेल्या कुरेशीला मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि महाराष्ट्रातील इतर भागांमध्ये खुनाचा प्रयत्न, खून, खंडणी, टोळीयुद्ध आणि दंगलीच्या गुन्ह्यांमध्ये आरोपी आहे. 2019 मध्ये, कुरेशी आणि त्याचा साथीदार, अमजद खान यांना मुंबई पोलिसांनी एका माणसाला गोळ्या घालून भोसकल्याच्या आरोपाखाली अटक केली होती. त्याला पकडण्यासाठी शहर आणि राज्यभरात व्यापक शोध सुरू होता.

एपीएमसी मार्केट गुन्हेगारांचा अड्डा...

दरम्यान,  नवी मुंबई मधील एपीएमसी मार्केटमध्ये दिवसाला मोठ्या प्रमाणात करोडोची आर्थिक उलाढाल होत असते. या मार्केटमध्ये बऱ्याच ठिकाणी बेकायदेशीर धंदे सुद्धा चालू आहेत. परंतु पोलीस मात्र दुर्लक्ष करत आहेत .असे मार्केट मधील कामगारांचे आरोप आहेत.  एपीएमसी मार्केट हे गुन्हेगारांचा अड्डा झाला असून नवी मुंबई पोलिसांनी त्यांच्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. दो दिन की जेल बाद मे बेल अशा प्रकारचा माणस गुन्हेगारांमध्ये झाला आहे. त्यामुळे पोलिसांची भीती गुन्हेगारांमध्ये राहिली नाही.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: