राहुल तपासे, प्रतिनिधी:
Satara Lady Doctor Death Case: रक्षकच भक्षक बनल्याची संतापजनक घटना साताऱ्यातून समोर आली आहे. सातारा जिल्ह्यातील फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरने फाशी घेत आत्महत्या केली. आत्महत्या करताना त्यांनी हातावर सुसाईड नोट लिहिली आहे ज्यामध्ये पोलीस निरीक्षक गोपाल बदने याने त्यांच्यावर चार वेळा बलात्कार केला, तर पोलीस प्रशांत बनकर याने त्यांना सतत मानसिक त्रास दिल्याचा आरोप केला आहे. (Phaltan Doctor Crime News)
या धक्कादायक प्रकरणात आता मोठी अपडेट समोर आली असून डॉक्टर तरुणीने तब्बल 21 वेळा तक्रार केल्याचे समोर आले आहे. खोटे रिपोर्ट देण्यासाठी माझ्यावर दबाव आणला जात आहे, अशा प्रकारची तक्रार त्यांनी वरिष्ठांकडे केली होती. याबाबतचे पत्रही आता समोर आले असून त्यामध्ये तीन अधिकाऱ्यांची नावेही देण्यात आली आहेत.
Islampur Rename: सांगलीतील इस्लामपूर शहराचं नाव बदललं; केंद्र सरकारची 'या' नावाला मान्यता
नेमकी काय केली तक्रार?
मी, वैदयकीय अधिकारी उपजिल्हा फलटण येथे कार्यरत असून फलटण ग्रामीण पोलिस रुग्णांना रुग्णालयात आणतात आणि पेशंट फिट नसतानाही मॅडम फिट असल्याचा रिपोर्ट द्या असे दबाव वारंवार टाकतात. याची पोलिस निरीक्षक मा. महाडीक सर यांना फोनद्वारे माहिती दिली असता त्यांनी देखील उडवाउडवीची उत्तरे दिली. तरी माननीय महोदय आपण लक्ष घालून योग्य ती कारवाई करावी त त्यांस योग्य ते मार्गदर्शन करावे, असं या तक्रारीत म्हटले आहे.
तसेच यामध्ये तीन अधिकाऱ्यांची नावेही दिली आहेत. ज्यामध्ये पोलिस उपनिरीक्षक माननीय पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक जायपत्रे, पोलिस उपनिरीक्षक बदने अशी या पोलिसांची नावे आहेत. या घटनेने संपूर्ण सातारा जिल्हा हादरुन गेला असून याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही कडक कारवाई केली आहे. या प्रकरणामध्ये नावे असणाऱ्या पोलिसांचे तडकाफडकी निलंबन करण्यात आले आहे.
(नक्की वाचा- Satara News: "माझ्यावर 4 वेळा बलात्कार केला..." पोलीस अधिकाऱ्यावर आरोप करत डॉक्टर तरुणीची आत्महत्या)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world