
शिवसेना शिंदे गटाला नागपुरात मोठा धक्का बसला आहे. नागपुरातील शिवसेना शिंदे गटाचा शहर संपर्क प्रमुख मंगेश काशिकर (44 वर्षे) यांच्या विरोधात विनयभंग आणि शारीरिक सुखाची मागणी केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर आरोपी नेता मंगेश काशिकर फरार झाल्याची माहिती आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
बजाजर नगर अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या महिलेने एका हॉटेलच्या उभारणीसाठी 1.5 कोटींची गुंतवणूक केली होती. काशीकरने हे हॉटेल स्वत:चे असल्याचा खोटा दावा केला होता. काशिकरने महिलेकडून दीड कोटी घेऊन काचीपुरा परिसरातील रेस्टॉरंट टाकले. काही काळापर्यंत मंगेश तिला ठरलेला दहा टक्के परतावा देत राहिला.
नक्की वाचा - Dombivli News: विधानसभा निवडणुकीचा राग आता राडा, डोंबिवलीत चाललंय काय?
मात्र, दरम्यानच्या काळात त्याने तिला अंगाला वारंवार स्पर्श करणे सुरू केले. त्यानंतर त्याने तिला थेट शरीर सुखाची मागणी केली. तिने नकार देताच तिला व्यवसायाच्या ठिकाणी येण्यास मज्जाव केला आणि परतावा देणं बंद केलं. दीड कोटी रुपये परत करण्यास देखील नकार दिला. त्याने केलेल्या मागणीवर जाब विचारण्यास गेलेल्या तिच्या भावाला आणि भावाच्या मित्राला त्याने पिस्तूल दाखवून पळवून लावले. यानंतर महिलेने शिवसेना शिंदे गटाचा शहर संपर्क प्रमुख मंगेश काशिकर यांच्या विरोधात विनयभंग आणि शारीरिक सुखाची मागणी केल्याचा गुन्हा दाखल केला. बजाजनगर पोलिसांनी गुन्हा नोंदवताच आरोपी गायब झाल्याचे कळते.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world