- उदयपूरमधील एका आयटी कंपनीच्या महिला मॅनेजरवर चालत्या कारमध्ये सामूहिक बलात्कार झाला आहे
- पीडित तरुणीला कंपनीच्या सीईओ, महिला एक्झिक्युटिव्ह हेड आणि तिचा पती यांनी कारमध्ये जबरदस्तीने नेले होते
- आरोपींनी पीडितेला सिगारेटमधून अमली पदार्थ देऊन बेशुद्ध करून तिच्यावर अत्याचार केले
एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत एक मोठ्या आयटी कंपनीत मॅनेजर पदावर काम करणाऱ्या तरुणीला पार्टीला जाणे महागात पडले. विशेष म्हणजे तिच्या बरोबर जो काही प्रकार झाला तो सर्वांनाच हादरवून सोडणारा होता. धक्कादायक म्हणजे यात एका महिलेचा ही समावेश होता. या तरुणी बरोबर सामूहिक बलात्कार करण्यात आला. तो ही धावत्या कारमध्ये. यावेळी कारमध्ये एका पेक्षा जास्त लोकांनी तिच्यावर अत्याचार केला. त्यावेळी कंपनीचीच एक वरीष्ठ पदावर काम करणारी महिलाही उपस्थित होती.
राजस्थानमधील उदयपूरमध्ये ही घटना घडल्याचे समोर आले आहे. इथं एका नामांकित आयटी कंपनीच्या महिला मॅनेजरवर चालत्या कारमध्ये सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पीडित महिलेने कंपनीचे सीईओ (CEO) आणि महिला एक्झिक्युटिव्ह हेडचा पती यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. पोलिसांनी याप्रकरणी मुख्य आरोपींसह एका महिलेला ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरू आहे. तपासात काही धक्कादायक बाबी पोलीसांच्या नजरेत आल्या आहेत. त्यानुसार चौकशीही सुरू झाली आहे.
20 डिसेंबर रोजी एका हॉटेलमध्ये कंपनीच्या सीईओची वाढदिवस आणि नवीन वर्षाची पार्टी आयोजित करण्यात आली होती. या पार्टीला पीडित तरूणीलाही निमंत्रित करण्यात आलं होतं. ती मॅनेजर पदावर काम करत होती. त्यामुळे तिच्या सर्व जण ओळखीचे होते. त्यामुळे ती ही बिनधास्त पार्टीला गेली. रात्री उशिरापर्यंत चाललेल्या या पार्टीत मद्यप्राशन करण्यात आले. सर्वांनी दारू घेतली होती. पीडित तरुणीने ही दारू घेतली होती. त्यामुळे पीडित महिला मॅनेजरची प्रकृती बिघडली. त्यामुळे तिला घरी सोडण्याच्या बहाण्याने आरोपींनी स्वतःच्या कारमध्ये तिला बसवले.
पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, कारमध्ये कंपनीची महिला एक्झिक्युटिव्ह हेड, तिचा पती आणि सीईओ उपस्थित होते. त्यांनी तिला घरी नेण्याच्या बहाण्याने कारमध्ये बसवले. त्या आधी पार्टीत आलेल्या सर्वांनी एकएक करून घरी पाठवण्यात आले. सर्वात शेवटी पीडित तरुणीला कारमध्ये टाकण्यात आले. वाटेत तिला सिगारेटमधून अमली पदार्थ देण्यात आला. ज्यामुळे ती बेशुद्ध पडली. या स्थितीचा फायदा घेत आरोपींनी तिच्यावर आळीपाळीने धावत्या कारमध्येच अत्याचार केला.
दुसऱ्या दिवशी पीडित तरुणी शुद्धीवर आली. त्यावेळी तिला आपल्या सोबत काही तरी चुकीचे झाले असल्याचं आंदाज आला. आपल्यावर अत्याचार झाल्याचं तिला समजलं. त्यामुळे ती हादरून गेली. अत्याचार करणारे आपल्याच ऑफीसमधील होते हे ही तिच्या लक्षात आले. त्यानंतर तिने वेळ न घालवता पोलिसांत धाव घेतली. शिवाय या लोकां विरोधात तक्रार नोंदवली. उदयपूरचे पोलीस अधीक्षक योगेश यादव गोयल यांनी सांगितले की, वैद्यकीय अहवाल आणि विधानांच्या आधारे पुढील कारवाई केली जाणार आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world