जाहिरात

Beed Crime : बीडमधील विकास बनसोडे हत्या प्रकरणात सहा जणांना अटक, 4 जणं अद्यापही फरार

विकास बनसोडे याच्या हत्येनंतर राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे.

Beed Crime : बीडमधील विकास बनसोडे हत्या प्रकरणात सहा जणांना अटक, 4 जणं अद्यापही फरार

Beed Crime : विकास बनसोडे या 23 वर्षीय तरुणाच्या बीडमध्ये खून करण्यात आला आहे. या प्रकरणात सहा जणांना अटक करण्यात आली आहे. तर चार जणं फरार आहेत. त्यांच्या शोधासाठी दोन पथके रवाना करण्यात आले आहेत. आष्टी तालुक्यातील पिंपरी (घुमरी) येथे ट्रॅक चालक असलेल्या विकास बनसोडे याच्यावर प्रेम संबंधाचा संशय घेऊन भाऊसाहेब क्षीरसागर याने दोरी आणि वायरच्या साहाय्याने विकासला मारहाण केली. दोन दिवस एका खोलीत डांबून त्याला मारहाण करण्यात आली. यात विकासचा मृत्यू झाला. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

विकास बनसोडेचा भाऊ आकाशच्या फिर्यादीवरून दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान मृतदेह घाटी रुग्णालयात आणला असून शवाविच्छेदन आज होणार आहे. भाऊसाहेब भानुदास क्षीरसागर, बाबासाहेब भानुदास क्षीरसागर, स्वाती भानुदास क्षीरसागर, सुवर्णा बाबासाहेब क्षीरसागर, संकेत भाऊसाहेब क्षीरसागर (रा. पिंपरी घुमरी), संभाजी झांबरे, सचिन भवर, सुशांत शिंदे, बापूराव शिंदे अशी आरोपींची नावं आहेत. तर यापैकी संभाजी झांबरे सचिन भवर, बाबासाहेब क्षीरसागर, बाबुराव शिंदे फरार आहे. इतर आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पथके रवाना झाली आहेत.

Beed Crime : 'ही माणसं आहेत की जनावरं?' बीडमध्ये 25 वर्षांच्या तरुणाचा मृत्यू, 2 दिवस डांबून जबर मारहाण

नक्की वाचा - Beed Crime : 'ही माणसं आहेत की जनावरं?' बीडमध्ये 25 वर्षांच्या तरुणाचा मृत्यू, 2 दिवस डांबून जबर मारहाण

काय आहे प्रकरण? 
मूळचा जालन्याचा 25 वर्षीय विकास बनसोडे बीडमधील आष्टी तालुक्यातील भाऊसाहेब क्षीरसागर यांच्याकडे ट्रक चालकाचं काम करीत होता. गेल्या चार वर्षांपासून तो इथं काम करीत होता. त्याचे भाऊसाहेब क्षीरसागर याच्या मुलीशी प्रेमप्रकरण सुरू होतं. त्या दिवशी घराच्या मागील बाजूच्या शेतात विकास आणि आपल्या मुलीला पाहून भाऊसाहेब क्षीरसागर संतापले. त्यांनी दोन दिवस विकासला डांबून ठेवलं आणि जबर मारहाण केली. त्याच्या शरीरभर व्रण दिसत आहेत. यातच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती आहे..

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: