जाहिरात

Solapur News: 4 वर्षांची चिमुकली देवदर्शनाला गेली, घरी परतत असताना देवाघरी गेली, वाटेत भयंकर घडलं

आरोही अजित कांगले ही चार वर्षाची चिमुकली आपल्या कुटुंबीयां बरोबर देवाच्या जत्रेला गेली होती.

Solapur News: 4 वर्षांची चिमुकली देवदर्शनाला गेली, घरी परतत असताना देवाघरी गेली, वाटेत भयंकर घडलं
सोलापूर:

विजयपूर ते रायचूर पॅसेंजर एक्सप्रेसमध्ये एक भयंकर आणि अंगावर काटा आणणारी घटना घडली आहे. या एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्या एका 4 वर्षाच्या चिमुकलीचा डोक्याला दगड लागल्याने तिचा जागीच मुत्यू झाला. धावत्या रेल्वेवर अज्ञात व्यक्तीने दगड भिरकावल्याने या चिमुकलीला नाहक आपला जीव गमवावा लागला आहे. या घटनेनं चिमुकलीच्या घरातले हळहळले आहेत. विशेष म्हणजे हे सर्व जण देवदर्शनावरून घरी परतत होते. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

आरोही अजित कांगले ही चार वर्षाची चिमुकली आपल्या कुटुंबीयां बरोबर देवाच्या जत्रेला गेली होती. कांगले कुटुंबातील जवळपास 35 ते 40 जण या जत्रेसाठी दरवर्षी जातात. जत्रेच्या दोन दिवस आधी हे कुटुंब सोलापूरवरून गेलं होतं. जत्रा आणि देवदर्शन झाल्यानंतर हे सर्व जण विजयपूर ते रायचूर पॅसेंजर एक्सप्रेस सोलापूरच्या दिशेने रवाना झाले होते. संपूर्ण कुटुंब एकाच बोगीत होतं. आरोही ही खिडकीच्या बाजूला बसून खेळत होती. 

ट्रेंडिंग बातमी - Nanded News: लग्न घरात मंडप टाकण्याचं काम, त्याच वेळी अचानक भयंकर घडलं, वरात निघण्या ऐवजी...

सोलापूरला ट्रेन पोहोचणार होती. ती  टिकेकरवाडी स्टेशनच्या अलीकडे होती. त्याच वेळी खिडीकीतून एक दगड जोरात ट्रेनच्या दिशेने आला. तो दगड खिडकीतून आरोहीच्या थेट डोक्याला लागला. हा फटका इतका जोरात होता की चिमुकल्या आरोहीला तो सहन झाला नाही. ती रक्तबंबाळ झाली. तिच्या नाका तोंडातून रक्त येत होते. ती मुर्चीत पडली होती. कुटुंबीयांनी तिचे रक्त रोखण्याचा प्रयत्न केला. 

ट्रेंडिंग बातमी - Sharad pawar: शरद पवारांसाठी नेत्याची भन्नाट सेटींग, लग्नाला यावं म्हणून काय केलं एकदा पाहाच

पुढे ती गाडी सोलापूरला थांबवण्यात आली. तातडीने तिला सोलापूरच्या राघोजी हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. मात्र त्यावेळी डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. अचानक झालेल्या या घटनेनं संपूर्ण कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. देव दर्शन करून आलेली चिमुकली देवाघरी निघून गेली. या घटनेनंतर अज्ञात व्यक्ती विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आहे. शिवाय आरोपीला कडक शिक्षा झाली पाहीजे अशी मागणी ही करण्यात आली आहे.