जाहिरात

Solapur News: आधी हात जोडले मग मृत्यूला कवटाळलं! प्रसिद्ध बेकरीच्या मालकाची 17व्या मजल्यावरून उडी VIDEO VIRAL

Solapur News: सोलापुरातील प्रसिद्ध बेकरीच्या मालकाने आत्महत्या केलीय. आत्महत्या करण्यापूर्वी शेवटची प्रार्थना करतानाचा त्यांचा व्हिडीओ पाहून डोळ्यांत पाणी येईल.

Solapur News: आधी हात जोडले मग मृत्यूला कवटाळलं! प्रसिद्ध बेकरीच्या मालकाची 17व्या मजल्यावरून उडी VIDEO VIRAL
"Solapur News: प्रसिद्ध बेकरीच्या मालकाची आत्महत्या"
NDTV Marathi

- सौरभ वाघमारे, प्रतिनिधी

Solapur News: एका हृदयद्रावक घटनेने सोलापूर शहर हादरले आहे. एकेकाळी प्रसिद्ध मुलतानी बेकरीचे मालक सुनील सदारंगानी (वय 60 वर्षे) यांनी इमारतीवरून उडी मारून आपली जीवनयात्रा संपवलीय. ही घटना विजापूर रोडवरील उच्चभ्रू वस्ती असलेल्या पनाश अपार्टमेंटमध्ये घडली आहे.

17व्या मजल्यावरून उडी मारून संपवले आयुष्य

मिळालेल्या माहितीनुसार, सुनील सदारंगानी हे गुरुवारी (5 फेब्रुवारी) दुपारच्या सुमारास विजापूर रोडवरील पनाश अपार्टमेंटमध्ये आले होते. लिफ्टचा वापर न करता ते पायऱ्यांनी थेट 17व्या मजल्यावर पोहोचले. 17व्या मजल्यावर पोहोचल्यानंतर ते भिंतीच्या कठड्यावर उभे राहिले. यावेळी ते अत्यंत भावुक अवस्थेत दोन्ही हात जोडून प्रार्थना करत असल्याचे काही लोकांनी पाहिले.

(नक्की वाचा: Jalna News: जालन्यात दहशत! हॉटेलसमोर लिंबू, हळदकुंकू, बाहुल्या, चिठ्ठ्यांमध्ये प्रतिष्ठित लोकांची नावं; काळ्या जादूनं गावं हादरलं)

सुरक्षारक्षकाची सतर्कता, पण नियतीचा वेगळा खेळ

कठड्यावर एक व्यक्ती उभी असल्याचे दिसताच स्थानिकांनी तातडीने इमारतीच्या सुरक्षारक्षकाला सावध केले. सुरक्षारक्षकाने प्रसंगावधान राखून 17व्या मजल्यावर धाव घेतली आणि सदारंगानी यांना सुखरूप खाली आणले. पण थोड्याच वेळात "माझी चावी वरच राहिली आहे" असा बहाणा करून सदारंगानी पुन्हा वर गेले. यावेळी कोणालाही काही समजण्यापूर्वीच त्यांनी इमारतीच्या 17व्या मजल्यावरून उडी मारली. या घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला.

(नक्की वाचा: Mumbai News: घरामध्ये चक्क पाळली मगर, रेस्क्यू ऑपरेशनचा थरार! मुंबईतील जुहूमध्ये खळबळ)

सोशल मीडियावर व्हिडीओ वायरलतपासाचे चक्र सुरू

सदारंगानी यांनी इतके टोकाचे पाऊल का उचलले? याचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आगेत. आत्महत्येमागे कौटुंबिक कारण आहे की आर्थिक समस्या? याचा शोध घेतला जातोय.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com