सौरभ वाघमारे, सोलापूर:
Solapur Crime: प्रेमात धोका मिळाल्याने तृतीयपंथी तरुणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोलापुरमध्ये घडली आहे. प्रकाश उर्फ स्विटी व्यंकप्पा कोळी असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. आत्महत्या करण्यापूर्वी स्विटीने एक व्हिडिओही बनवला, ज्यामध्ये तिने सुजित जामदार नावाच्या तरुणाकडून फसवणूक झाल्याचं म्हटले आहे.
प्रेमात धोका, तृतीयपंथ्याची आत्महत्या
समोर आलेल्या माहितीनुसार, प्रियकराने लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक करत दुसऱ्याशी लग्न करत असल्याचा आरोप करत पारलिंगी समुदायातील एका व्यक्तीने आत्महत्या केल्याची घटना सोलापूरमध्ये घडली आहे. सोलापुरातील बाळे येथे ही दुर्दैवी घटना घडली. आत्महत्येपूर्वी या तृतीयपंथी तरुणीने व्हिडिओ करत तिची फसवणूक झाल्याचे सांगितले आहे.
Nagpur Crime: चुलत भाऊ बहिणीचे प्रेमसंबंध, टोकाचा वाद अन् झोपेतच मर्डर; नागपुरात खळबळ
या व्हिडिओमध्ये तरुणीने सुजीत जामदार नावाच्या तिच्या प्रियकराचा उल्लेख केला आहे. ‘माझे आणि त्याचे मागील आठ वर्षांपासून प्रेम संबंध होते, त्याने माझ्यासोबत लग्न केलं, मला दुसरीकडे आणून ठेवलं, माझ्या समाजाशी माझे संबंध तोडले, आणि आता तो दुसर लग्न करतोय, त्यामुळे मी आत्महत्या करत असून याला पूर्णपणे तोच जबाबदार आहे' असं तिने म्हटले आहे.
व्हिडिओही बनवला..
दरम्यान या घटनेने सोलापुरात एकच खळबळ उडाली असून सोलापूरच्या शासकीय रुग्णालय परिसरात पारलिंगी समुदायतील व्यक्तींनी मोठी गर्दी केली आहे. आरोपी तरुणावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी मृत व्यक्तीच्या नातेवाईकांकडून केली जात आहे. तरुणाच्या हळदी दिवशीच प्रेयसीने आत्महत्या केल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world