जाहिरात

Thane News: ठाणे हादरलं! नौपाड्यात 7 वर्षांच्या मुलीवर 45 वर्षीय बांधकाम मजुराचा बलात्कार, कशी उघडकीस आला घटना

Thane News: ठाणे शहरात माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. नौपाडा येथील एका बांधकाम स्थळावर 7 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या 45 वर्षीय नराधम मजुराला पोलिसांनी अटक केली आहे, वाचा सविस्तर बातमी.

Thane News: ठाणे हादरलं! नौपाड्यात 7 वर्षांच्या मुलीवर 45 वर्षीय बांधकाम मजुराचा बलात्कार, कशी उघडकीस आला घटना
"Thane News: ठाण्यात 7 वर्षीय मुलीवर 45 वर्षीय व्यक्तीने बलात्कार केला"
Canva

Thane News: ठाणे शहराच्या नौपाडा परिसरातून एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीच्या ठिकाणी अवघ्या सात वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार केल्याप्रकरणी 45 वर्षीय मजुराला पोलिसांनी अटक केली आहे. सोमवारी (6 एप्रिल) संध्याकाळी ही घटना घडली असून पोलिसांनी तत्परता दाखवत अवघ्या काही तासांत आरोपीला जेरबंद केले.

(नक्की वाचा: Navi Mumbai News: नवी मुंबई हादरली! मध्यरात्री बाइकवरून आला, एकावर 4 गोळ्या झाडल्या अन्... ऐरोलीत दहशत)

चिमुकली घाबरली अन्...

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित बांधकाम स्थळावर पीडित मुलीचे आई-वडील मजुरीचे काम करतात. आरोपी देखील त्याच ठिकाणी काम करत होता. सोमवारी संध्याकाळी संधी साधून आरोपीने या सात वर्षांच्या चिमुरडीचे लैंगिक शोषण केले. या धक्कादायक प्रसंगामुळे पीडित मुलगी प्रचंड घाबरली होती. तिने रडत रडत आपल्या आई-वडिलांना घडलेला प्रकार सांगितला.

(नक्की वाचा: Navi Mumbai News: नवी मुंबईत ACBचा मोठा दणका; GST विभाग अधिकारी अन् महिला सहाय्यक लाच घेताना जाळ्यात)

काही तासांत आरोपीला ठोकल्या बेड्या

आपल्या मुलीसोबत घडलेला प्रकार ऐकून पालकांनी विलंब न करता नौपाडा पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने चक्र फिरवली आणि आरोपीला अटक केली. पोलिसांनी याप्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) आणि पोक्सो (POCSO) कायद्यातील विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे बांधकाम स्थळावरील महिला आणि बालकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

(Content Source : PTI)

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com