जाहिरात

Akola News: अकोल्यात चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच, सिने-स्टाईल पाठलाग करून चोरट्याला रंगेहाथ पकडलं, पाहा व्हिडीओ

अकोला शहरात चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून खदान पोलीस स्टेशन हद्दीतील मलकापूर परिसर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.व्हायरल व्हिडीओमुळे खळबळ उडाली आहे.

Akola News: अकोल्यात चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच, सिने-स्टाईल पाठलाग करून चोरट्याला रंगेहाथ पकडलं, पाहा व्हिडीओ
Akola Thief Video Viral

योगेश शिरसाट, प्रतिनिधी 

Akola Thief Video Viral :  अकोला शहरात चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून खदान पोलीस स्टेशन हद्दीतील मलकापूर परिसर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून या भागात घरफोडी, दुचाकी चोरी आणि संशयास्पद हालचालींच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काही दिवसांपूर्वी म्हणजेच 18 तारखेला एका अपार्टमेंटमधून दुचाकी चोरीचा प्रयत्न झाला होता. मात्र नागरिकांच्या सतर्कतेमुळे तो प्रयत्न अयशस्वी ठरला. या संपूर्ण घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले होते, ज्यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे.

सीसीटीव्हीत संशयितांची हालचाल, चाकू दाखवत पळून जाण्याचा प्रयत्न

दरम्यान आज आरोग्यधाम कॉलनी परिसरात दोन संशयित व्यक्ती चोरीच्या उद्देशाने फिरत असल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले. ही बाब लक्षात येताच परिसरातील काही नागरिकांनी तात्काळ त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र स्वतःला अडवले जात असल्याचे पाहून त्या संशयितांनी चाकू काढून नागरिकांवर हल्ल्याचा प्रयत्न करत तेथून पळ काढला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. मात्र धाडस दाखवत नागरिकांनी त्यांचा पाठलाग सुरू ठेवला.

नक्की वाचा >> Maharashtra Kesari Final: एकाच गुरुचे 2 शिष्य भिडले, नाशिकचा हर्षवर्धन सदगिर ठरला ‘डबल महाराष्ट्र केसरी'

सिनेमा स्टाईल पाठलाग; एका चोरट्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं

संशयितांनी पळ काढल्यानंतर नागरिकांनी सिनेमा स्टाईल पाठलाग करत त्यापैकी एका चोरट्याला पकडण्यात यश मिळवले. संतप्त नागरिकांनी त्याला चोप देत खदान पोलिसांच्या ताब्यात दिले. दुसरा संशयित मात्र पळून जाण्यात यशस्वी झाला असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे. दरम्यान, मलकापूर आणि आसपासच्या भागात वाढत्या चोरीच्या घटनांमुळे स्थानिक नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर नगरसेवक पराग गवई यांच्यासह परिसरातील नागरिकांनी या भागात कायमस्वरूपी पोलीस चौकी उभारण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे. पोलिसांनीही या प्रकरणाचा तपास सुरू केला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असल्याची माहिती समोर आली आहे.

नक्की वाचा >> Pune News: 'महाराष्ट्र केसरी' कुस्ती स्पर्धा वादाच्या भोवऱ्यात,CM फडणवीसांनी स्पर्धेकडे फिरवली पाठ, कारण काय?

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com