पुण्याहून ठोसेघरला धबधबा पाहण्यासाठी काही युवक गेले होते. धबधबा पाहून झाल्यानंतर हे युवक आपल्या चारचाकीने परतीचा प्रवास करत होते. त्याच वेळी सज्जनगड फाट्या जवळ आल्यानंतर त्यांच्या कारचा अपघात झाला. या फाट्या जवळ असलेल्या कारी गावच्या बाजूला सुमारे 200 फूट खोलदरीत ही कार कोसळली. त्यावेळी कारमध्ये दोन तरूण आणि एक महिला होती. कार खोल दरीत कोसळल्यानंतर या तिघांनीही मदतीसाठी टाहो फोडला.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पुणे येथील हे पर्यटक ठोसेघर चाळकेवाडी परिसरात पावसाळी पर्यटनासाठी गेले होते. तेथून ते परत येत असताना, ज्या ठिकाणी उरमोडी धरणाचा व्ह्यू पाहण्यासाठी गाड्या थांबतात, त्या ठिकाणी ते थांबले होते. त्याच वेळी त्यांना दरीचा अंदाज आला नाही. त्यामुळे त्यांची गाडी थेट रस्ता सोडून खोल दरीत कोसळली. ही घटना या ठिकाणी उभ्या असलेल्या युवकांनी पाहिली. त्यांनी तात्काळ ही घटना पोलिसांना कळवली. त्यांनी तात्काळ मदतीसाठी चक्र फिरवली.
ट्रेंडिंग बातमी - वरिष्ठाने सुट्टी नाकारली, 30 वर्षांच्या महिलेचा ऑफिसमध्येच मृत्यू
गाडी खोल दरीत होती. त्यात असलेले तिघेही मदतीसाठी ओरडत होते. त्यांची गाडी दरीत पलटी मारत गेली होती. त्यामुळे तिघेही जखमी झाले होते. अशा वेळी अंबवडे येथील नितीन देशमुख ,निलेश देशमुख ,सागर देशमुख आणि विजय जिमन हे तरूण दरीत उतरले. गाडी जवळ गेल्यानंतर त्यांना तिथली बिकट स्थिती समजली. गाडीत त्यावेळी दोन युवक आणि एक महिला जास्त जखमी होती.
ट्रेंडिंग बातमी - बांगलादेशी पॉर्नस्टारला उल्हासनगरमधून अटक, तपासात धक्कादायक माहिती आली समोर
हे चार युवक ज्यावेळी गाडी जवळ पोहोचले त्यावेळी त्यांनी जखमींना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. ते तिघे ही घाबरले होते. त्यांना काळजी करू नका तुम्हाला आम्ही वाचवू असा विश्वास या युवकांनी दिला. त्यात महिला जास्त जखमी झाली होती. या तिघांनाही गाडी बाहेर काढण्यात आले. तोपर्यंत रुग्णवाहीका बोलावण्यात आली होती. या सर्वांना गाडीतून बाहेर काढण्यात आले. नंतर दरीतूनही बाहेर काढण्यात आले. बाहेर आल्यानंतर त्यांना तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आले. सर्व जण आता सुखरूप आहेत. त्यांना तात्काळ मदत मिळाल्यामुळे त्यांचे प्राण वाचले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world