जाहिरात

Uber कॅब ड्रायव्हरची तब्येत अचानक बिघडली; महिलेने असं काही केलं की सोशल मीडियावर होतंय कौतुक

Viral Video : हनी पिपल असं या महिलेचं नाव आहे. तिच्या सतर्कतेमुळे मोठा धोका टळला. महिला तिची आई, मुलगी आणि आजीसोबत गुरुग्रामहून दिल्लीला परतत असताना ही घटना घडली.

Uber कॅब ड्रायव्हरची तब्येत अचानक बिघडली; महिलेने असं काही केलं की सोशल मीडियावर होतंय कौतुक

दिल्लीच्या एका महिलेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. ज्यामध्ये ही महिला कार चालवताना दिसत आहे. मात्र ती कार तिची नसून Uber ची कॅब आहे. महिला ड्रायव्हिंग सीटवर आहे, तर ड्रायव्हर मागच्या सीटवर बसलेला दिसत आहे. ड्रायव्हरची तब्येत अचानक बिघडल्याने प्रवासी महिलाने ड्रायव्हरला मागे बसवलं आणि स्वत: ड्रायव्हिंग सीटचा ताबा घेतला. महिलेच्या या कृतीमुळे तिचं सोशल मीडियावर कौतुक होत आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

हनी पिपल असं या महिलेचं नाव आहे. तिच्या सतर्कतेमुळे मोठा धोका टळला. महिला तिची आई, मुलगी आणि आजीसोबत गुरुग्रामहून दिल्लीला परतत असताना ही घटना घडली. सुरुवातीला ड्रायव्हरने अस्वस्थ वाटत असल्याचं  त्यांना सांगितलं.  मात्र ड्रायव्हरची तब्येत बिघडू लागल्याने हनीने परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेत ताबडतोब गाडीचा ताबा घेतला. हनीने ड्रायव्हरला मागच्या सीटवर बसवलं आणि आराम करायला सांगितलं. हनीने घेतलेला धाडसी निर्णय सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे.

(नक्की वाचा- Ghost Tree : वर्ध्यातील जंगलात 'भुताचे झाड', रात्रीच्या अंधारात दिसतंय पाढरं शुभ्र)

पाहा VIDEO

हनी पिपलचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती घडलेला संपूर्ण प्रकार सविस्तर सांगताना दिसत आहे. हनीने सर्वांना ड्रायव्हिंग शिकण्याचे आवाहन केले. जेणेकरून ते कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत स्वतःला आणि इतरांना मदत करू शकतील. 

हनी म्हणाली की, "सर्वांना विनंती करते की तुम्ही गाडी चालवायला शिका. जर तुम्हाला गाडी कशी चालवायची हे माहीत असेल, तर तुम्ही कोणत्याही गरजू व्यक्तीला कधीही मदत करू शकता." हनी यावेळी ड्रायव्हरची मस्करी देखील करताना दिसली. "कॅबचं जे बिल होईल ते आपण निम्मे निम्मे वाटून घेऊ. तुम्ही आता लवकर बरे व्हा, ट्रॅफिक वाढायला लागली आहे", अशी मिश्किल टिप्पणी हनीने ड्रायव्हरला उद्देशून केली. 

(नक्की वाचा-  HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी 30 जूनपर्यंत मुदवाढ; वाहनधारकांचं टेन्शन मात्र कायम, काय आहे कारण?)

हनीच्या कृतीचे सोशल मीडियावर भरभरून कौतुक होत आहे.तर अनेकांनी ऑनलाईन कॅब कंपन्यांना सुरक्षा प्रोटोकॉल मजबूत करण्याचे आवाहन केले. जेणेकरून अशा परिस्थितीत प्रवाशांना कोणतीही समस्या येऊ नये.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: