अभिनेत्री उर्मिला कानेटकर कोठारे हिच्या कारला अपघात झाला आहे. या अपघातात एकाचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. उर्मिला शुटींग संपल्यानंतर घरी परत येत होती. त्यावेळी कांदिवलीतल्या पोईसर मेट्रो रेल्वे स्टेशन जवळ हा अपघात झाला. गाडी उर्मिलाचा ड्रायव्हर चालवत होता. जिथे अपघात झाला तिथे मेट्रोचे काम सुरू होते. त्याने दोन कामगारांना गाडी खाली चिरडले. त्यात एकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
शुटींग संपल्यानंतर उर्मिला कानेटकर ही आपल्या घरी परत जात होती. ज्यावेळी तिची गाडी कांदिवलीतल्या पोईसर मेट्रो स्टेशन जवळ आली त्यावेळी तिची गाडी वेगात होती. त्यागाडीवरचे चालकाचे नियंत्रण सुटले. त्याने थेट तिथे मेट्रोचे काम करत असलेल्या दोघांना उडवले. ही ठोकर इतकी जोरात होती की गाडीच्या बोनटचा चक्काचुर झाला. या अपघातात एक मजूराचा मृत्यू झाला आहे. तर दुसरा मजूर हा जखमी झाला असून त्याच्यावर माऊली रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हे रुग्णालय मालाड इथे आहे.
या अपघातात अभिनेत्री उर्मिला कानेटकरही किरकोळ जखमी झाली आहे. अपघात झाला त्यावेळी एअर बॅग वेळीच ओपन झाल्यामुळे तिला किरकोळ दुखापत झाली. चालकही या अपघातात जखमी झाला आहे. या दोघांवर सध्या कांदिवलीच्या नमः हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. समतानगर पोलिस स्थानकात याबाबतचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उर्मिला कानेटकर या आदिनाथ कोठारे यांच्या पत्नी आहेत. प्रसिद्ध दिग्दर्शक महेश कोठारे हे त्यांचे सासरे आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world