Shocking Rape News: पाच वर्षांच्या चिमुकलीसोबत जे काही घडलंय, ते ऐकून स्थानिकांना मोठा हादरा बसलाय. कथित स्वरुपात पाच वर्षांच्या मुलीवर बलात्कार करुन आरोपीने तिला गंभीर अवस्थेत सोडून पळ काढल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. पीडित मुलीची प्रकृती अतिशय नाजूक आहे. हैराण करणारी बाब म्हणजे पाच वर्षांच्या मुलीचा बलात्कार केल्याप्रकरणी 12 वर्षांच्या मुलाला ताब्यात घेण्यात आलंय. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीवर मेरठ शहरामध्ये औषधोपचार सुरू आहेत. पीडितेची प्रकृती अतिशय गंभीर आहे.
आरोपीने मुलीला बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी नेले | Uttar Pradesh Crime News
उत्तर प्रदेशातील मुरादाबाद शहरामध्ये ही हादरवणारी घटना घडलीय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी (29 ऑक्टोबर) संध्याकाळी पीडित मुलगी तिच्या घराबाहेरच्या परिसरात खेळत होती. त्यावेळेस आरोपी मुलगा मुलीला घेऊन परिसरातील एका बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी गेला आणि तेथे तिच्यावर बलात्कार केला. मुलीला गंभीर अवस्थेत तेथेच सोडून त्याने पळ काढला.
(नक्की वाचा: Pune News: 'मला प्रेग्नेंट करू शकेल अशा पुरुषाच्या शोधात' या वाक्याला पुण्याचा ठेकेदार भुलला आणि भलताच अडकला)
पीडित मुलीची प्रकृती गंभीर
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शेजारी राहणाऱ्या लोकांनी मुलीला हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिची प्रकृती गंभीर असल्याचे पाहता डॉक्टरांनी मेरठमधील एका विशेष वैद्यकीय केंद्रामध्ये नेण्याचा सल्ला दिला, जेथे पीडितेवर उपचार सुरू आहेत. पण प्रकृती अद्याप नाजूकच आहे.
(नक्की वाचा: Mumbai KEM Doctor Stabbed: साताऱ्यानंतर आता मुंबईच्या सरकारी डॉक्टरसोबत भयंकर घडलं, भररस्त्यात चाकूने केले सपासप वार; कारण...)
पोलिसांनी सांगितले की, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन आरोपीची ओळख पटवून तपास सुरू केला आणि शुक्रवारी (31 ऑक्टोबर) त्याला ताब्यात घेतले. पुढील चौकशी सुरू आहे. घडलेला प्रकार अतिशय गंभीर आणि धक्कादायक आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

