
मनोज सातवी, प्रतिनिधी
Bhayander News : धावत्या लोकलमधून फेकलेल्या निर्माल्यातील नारळ तरुणाच्या जीवावर बेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. डोक्याला मार लागून गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. संजय दत्ताराम भोईर (वय 31) असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे. भाईंदर-नायगाव रेल्वे स्टेशन दरम्यान ही घटना घडली. भाईंदर रेल्वे खाडी ब्रीजवरून चालत जात असताना लोकल ट्रेनमधून प्रवाशाने निर्माल्य खाडीत फेकताना ही दुर्घटना घडली. मृत संजय भोईर हा तरुण पाणजू बेटावर राहत होता.
धावत्या लोकलमधून निर्माल्यातील नारळ फेकल्याने एका तरुणाच्या डोक्याला मार लागून तो तरुण गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारदरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला आहे. संजय दत्ताराम भोईर (वय 31) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. सुरुवातीला त्याला वसईतल्या खासगी रुग्णालयात नेण्यात आले होते. मात्र प्रकृती खालावल्याने त्याला मुंबईच्या जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ही घटना शनिवारी सकाळी पावणे नऊच्या दरम्यान भाईंदर नायगाव रेल्वे स्टेशनवरील, भाईंदर रेल्वे खाडी ब्रीजवर घडली आहे. जखमी तरुण पाणजू या बेटावर राहत होता.
नक्की वाचा - वहिनीच्या सौंदर्यावर नणंद फिदा, WhatsApp वर प्रायव्हेट चॅट; प्रेमाचं इतकं वेड की दोघांनी केलं मोठं कांड
विशेष म्हणजे पाणजू बेटावर जाण्यासाठी बोट किंवा रेल्वेच्या पुलाचा वापर करावा लागतो. मात्र हवामान खात्याच्या अलर्टमुळे बोट बंद होती. त्यामुळे संजय कामावर जाण्यासाठी रेल्वे पुलावरून नायगावच्या दिशेने येत असताना लोकल ट्रेनमधून खाडीत विसर्जनासाठी फेकलेल्या निर्माल्यातील नारळ थेट संजयच्या कान आणि डोळ्याच्या मधल्या भागात लागला. हा नारळ इतक्या जोरात लागला की संजय यात जबर जखमी झाला. यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world