
Love affair between sister-in-law and her husband's sister : मध्यप्रदेशातील जबलपूरमधून एक हैराण करणारं प्रकरण समोर आलं आहे. येथे एका नणंदेवर वहिणीला पळवून घेऊन जाण्याचा आरोप आहे. हा आरोप भावाने आपल्या बहिणीवर लावला आहे. भावाने पोलिसांकडे पत्नी आणि बहिणीचे WhatsApp चॅट शेअर केले आहेत. हे प्रकरण लेस्बियन संबंधाचं असून पोलिसांची टीम दोघांचा शोध घेत आहे. जाणून घेऊया काय आहे प्रकरण...
ही घटना अमरपाटन भागातील आहे. येथे आशुतोष नावाच्या तरुणाने सात वर्षांपूर्वी संध्यासोबत प्रेमविवाह केला होता. दोघाचा संसार आनंदात सुरू होता. त्यांना एक पाच वर्षांचा मुलगाही आहे. मुलाच्या चांगल्या भवितव्यासाठी आशुतोष जबलदपूरला शिफ्ट झाला. जबलपूरच्या घरी आशुतोषच्या मामे बहिणीचं येणं-जाणं असायचंय. यावेळी आशुतोषची मामे-बहीण आणि त्याच्या पत्नीमध्ये बऱ्याच गप्पा व्हायच्या. ते एकत्र बाजारात जातं. कौटुंबीय नातं असल्याने कोणी शंकाही उपस्थित केली नव्हती. यादरम्यान 12 ऑगस्टला संध्या अचानक घरातून गायब झाली.
दुसऱ्या दिवशी ती स्टेशनवर भेटली. आशुतोष तिला पुन्हा घरी घेऊन आला. मात्र २२ ऑगस्टला ती पुन्हा पळून गेली. यानंतर घरात तपास करीत असताना आशुतोषला संध्याचा मोबाइल सापडला. जेव्हा त्याने फोन तपासला तर त्यात नणंदसोबत पत्नीची रोमॅटिंग चॅट दिसले. जे पाहिल्यानंतर पतीच्या पायाखालची जमीन सरकली. यामध्ये दोघांमधील खासगी गप्पा होता. तेव्हा आशुतोषचा संशय बळावला.

आशुतोषला सांगितलं की, या व्हॉट्सअॅप चॅटवरुन लक्षात येतं की हे प्रकरण समलैंगिक संबंधाचं आहे. सध्या आशुतोषने पोलीस ठाण्यात पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार केली आहे. पोलीस दोघांचाही तपास करीत आहे. यावेळी आशुतोषने बहिणी आरोप केला आहे, ती यापूर्वीही काही मुलींसोबत पळून गेली होती. मात्र दोन्ही महिला सापडल्यानंतरच या प्रकरणातील सत्य समोर येईल.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world