जाहिरात

Vasai News : गुजराती भाषेत बोलून गंडवलं...! वृद्ध आजोबांसमोर चोरट्याने घरातील दीड कोटींचा माल केला लंपास

मुंबईलगतच्या वसईमध्ये भरदिवसा तब्बल 1.5 कोटी रुपयांची चोरी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Vasai News : गुजराती भाषेत बोलून गंडवलं...! वृद्ध आजोबांसमोर चोरट्याने घरातील दीड कोटींचा माल केला लंपास

मनोज सातवी, प्रतिनिधी 

Vasai 1.5 crore stolen from house : मुंबईलगतच्या वसईमध्ये भरदिवसा तब्बल 1.5 कोटी रुपयांची चोरी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. वसई पश्चिमेच्या किशोर कुंज सोसायटीत राहणारे उधोजी भानुशाली यांचा मुलगा मितेश, आई आणि घरातील महिला रक्षाबंधन साजरा करण्यासाठी मामाच्या घरी गेले होते. त्यावेळी घरात एकटेच वृद्ध गृहस्थ उपस्थित होते. हीच संधी साधत चोरट्यांनी घरात धाड घातली.

चोरांनी वृद्ध उधोजी भानुशाली यांना त्यांच्या कच्छी बोली भाषेत बोलण्यात गुंतवले आणि बोलण्यातच चोरट्यांनी आजोबांना गंडवलं. चोरट्याने सुरुवातीला आपल्याला याच परिसरात भाड्याने घर पाहिजे असे सांगून आजोबांना बोलण्यात गुंतवले. आधी पिण्यासाठी पाणी मागितले आणि नंतर वॉशरूममध्ये जायचं आहे असं सांगून वॉशरूमला गेला. पण लगेचच ओरडत बाहेर येऊन तुमचे टॉयलेट लिकेज आहे. आजोबा देखील घाईगडबडीत नेमकं काय झाले ते बघण्यासाठी बाथरूममध्ये गेले. त्याचवेळी चोरट्याने त्यांना मागून धक्का दिला आणि टॉयलेटमध्ये बंद करून बाहेरून कडी लावून घेतली.

Video : 2 मिनिटभर बापाला थोबाडीत मारलं, आई शेजारी बसून मेंदी काढत राहिली; नागपूरमधील संतापजनक दृश्य

नक्की वाचा - Video : 2 मिनिटभर बापाला थोबाडीत मारलं, आई शेजारी बसून मेंदी काढत राहिली; नागपूरमधील संतापजनक दृश्य

आजोबांना शौचालयात बंद करून चोर पसार...

आजोबांना शौचालयात बंद करून संपूर्ण घरातील रोख रक्कम, दागदागिने आणि अन्य मौल्यवान वस्तू लंपास केल्या. चोरीची एकूण रक्कम सुमारे 1 कोटी 50 लाख रुपये असल्याचा अंदाज आहे. ही घटना भरदिवसा घडल्यामुळे स्थानिक रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. सुरक्षेच्या दृष्टीने चिंता व्यक्त केली जात आहे. पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून, तसेच dog squad च्या माध्यमातून आरोपींचा शोध सुरू आहे. या प्रकरणी पुढील तपास माणिकपूर पोलीस ठाण्याकडून सुरू आहे. पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com