
प्रशांत जव्हेरी
नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्याच्या दुर्गम भागात आजही अंधश्रद्धा मोठ्या प्रमाणात पाळली जात आहे. याबाबतचे एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. धडगाव तालुक्यातील वावी गावात एक महिला आपल्या कुटुंबासह राहाते. या महिलेला गावातल्या काही लोकांनी डाकीण ठरवलं. तू डाकीण आहेस असं तिला हिणवलं जात होतं. शिवाय ती जादूटोणा करते. त्यामुळेच गावातली लोकं आजारी पडत आहेत असा आरोप करत ते नेहमी करत. त्यानंतर तिला जिवे मारण्याची धमकीही देण्यात आली. वारंवार होणाऱ्या या त्रासाला कंटाळून या महिलेने शेवटी गाव सोडले. पण तरीही त्रास काही कमी होत नव्हता. शेवटी ती अंधश्रद्ध निर्मूलन समितीकडे गेली. त्यानंतर या प्रकरणाला वाचा फुटली.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
बालदिबाई ठाकरे ही महिला आपल्या कुटुंबासह वावी गावात राहात होती. गावातले कागडा ठाकरे आणि आमशा ठाकरे तिला सतत हिणवत असतं. तू डाकीण आहे असे ते नेहमी म्हणायचे. डाकीण असल्याचा संशयावरून गावातील नागरिकांनी तिला त्रास देण्यास सुरुवात केली. ती जादूटोणा करून गावातील नागरिकांना त्रास देत असल्याचा आरोप तिच्यावर आरोप करत होते. गावातील काही जणांनी तिला आणि तिच्या कुटुंबाला मारहाण केली होती. वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून या कुटुंबाने गाव सोडलं होतं.
ट्रेंडिंग बातमी - 'आम्हाला बांबू लावायचं काम सुरू' सर्वां समोर अजित पवार असं का म्हणाले?
संपूर्ण कुटुंब आपलं राहातं घर सोडून दुसऱ्या गावाला स्थायिक झाले. गाव सोडलं असलं तरी त्रास काही कमी झाला नव्हता. कुटुंबाला जाणीवपूर्वक त्रास दिला जात होता. शेवटी या कुटुंबाने ही बाब अंधश्रद्धा निर्मूलन समितीला सांगितली. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी या कुटुंबाची मदत केली. त्यांनी या प्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतली. गावात त्या महिले बरोबर काय झालं याची सर्व कथा सांगितली. शिवाय जे लोक या मागे आहेत त्यांच्यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली. हा प्रकार गंभीर असून तातडीने कारवाई झाली नाही तर आणखी कुठल्यातरी एका कुटुंबाला अशा पद्धतीचे आरोप करून गावा बाहेर काढलं जाईल. असं अंधश्रद्धा निर्मूलन समितीने सांगितलं.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आणि पीडित महिलेने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना सदर बाब सांगितल्यानंतर पोलिसांनी कारवाईचे आश्वासन दिले आहे. यासंदर्भात सखोल तपासाचा आदेश धडगाव पोलीस स्टेशनला दिला आहे. एकीकडे सरकारने अंधश्रद्धा विरोधी कायदा, जादूटोना कायदा अस्तित्वात आणला. पण त्याचा धाक कोणाला आहे की नाही अशी बोलण्याची वेळ आली आहे. आजही दुर्गम भागात अनेक अंधश्रद्धा असून या गुन्ह्यांकडे पोलीस खात्याने गंभीर्यपूर्व लक्ष दिले पाहीजे अशी अपेक्षा अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world