जाहिरात

Pune Crime : स्वारगेट प्रकरणानंतर पुण्यातून आणखी एक संतापजनक घटना; कॅबमध्येच तरुणीचा विनयभंग

ही तरुणी एका आयटी कंपनीत काम करते. कामावरुन घराच्या दिशेने असताना तिच्यासोबत धक्कादायक कृत्य झालं.

Pune Crime : स्वारगेट प्रकरणानंतर पुण्यातून आणखी एक संतापजनक घटना; कॅबमध्येच तरुणीचा विनयभंग

Pune Crime : पुण्यातील स्वारगेट बस स्टँडवरील शिवशाहीत एका 26 वर्षीय तरुणीवर बलात्काराची घटना ताजी असताना पुण्यातूनही आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शिक्षण आणि नोकरीनिमित्ताने पुण्यात येणाऱ्या तरुणांची संख्या मोठी आहे. पुण्यातील आयटी कंपन्यांमध्ये देशाच्या कानाकोपऱ्यातून तरुण येत असतात. यातच एक आयटी कंपनीत काम करणाऱ्या तरुणीला धक्कादायक अनुभवाला सामोरं जावं लागलं आहे. 

धावत्या कारमध्ये या तरुणीसोबत चालकाने नको ते कृत्य करण्याचा प्रयत्न केला. यानंतर घाबरलेल्या महिलेने कारमधून उडी मारली. यानंतर तब्बल दोन किलोमीटर धावत जाऊन तिने खडकी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. स्वारगेट एसटी स्थानकात शिवशाही बसमध्ये झालेल्या अत्याचाराच्या घटने अगोदर एक दिवस ही घटना घडली. यामुळे एकंदरच शहरातील महिला सुरक्षे संदर्भात प्रश्‍न उभा राहिला आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

पुण्यातील आयटी कंपनीतील महिलेला कॅब प्रवासात धक्कादायक अनुभवाला सामोरे जावे लागले. धावत्या कारमध्ये तीच्यासोबत चालकाने नको ते कृत्य करण्याचा प्रयत्न केला. भेदरलेल्या महिलेने कारमधून उडी टाकली. यानंतर तीने तब्बल दोन किलोमीटर धावत जाऊन खडकी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. स्वारगेट एसटी स्थानकात शिवशाही बसमध्ये झालेल्या अत्याचाराच्या घटने अगोदर एक दिवस ही घटना घडली. यामुळे एकंदरच शहरातील महिला सुरक्षे संदर्भात प्रश्‍न उभा राहिला आहे.

Pune Swargate Crime : पुण्यातील बड्या नेत्याचा कार्यकर्ता? पुणे स्वारगेट अत्याचार प्रकरणात आरोपीचं भयंकर रुप समोर

नक्की वाचा - Pune Swargate Crime : पुण्यातील बड्या नेत्याचा कार्यकर्ता? पुणे स्वारगेट अत्याचार प्रकरणात आरोपीचं भयंकर रुप समोर

या प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार, ही 41 वर्षीय महिला एका आयटी कंपनीत टेक्नोलॉजी प्रोफेशनल म्हणून काम करते. पीडित महिलेने एका प्रसिद्ध अॅग्रीगेटर अॅपद्वारे कॅब बुक केली. कल्याणीनगर येथून सुमारे साडेसातच्या सुमारास महिला पिंपळे सौदागर येथे जाण्यासाठी निघाली. गाडी संगमवाडी रोडमार्गे पाटील इस्टेट चौकाच्या दिशेने जात असताना चालकाने गाडीचा आरसा महिला दिसेल असा सेट केला. यानंतर तो चालत्या गाडीत आरशात महिलेला पाहून अश्लील कृत्य करू लागला. यानंतर महिला घाबरली आणि तिने गाडी सिग्नलजवळ येताच पळ काढला. यानंतर महिलेने दोन किलोमीटर धावत जाऊन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी महिलेकडून कॅब बुकिंगचा तपशील आणि वाहन क्रमांक घेतला. त्याआधारे कॅब मालकाचा शोध लागल्यावर चालकाला अटक करण्यात आली. आरोपी मूळचा उत्तर प्रदेशातील असून काही दिवसांपूर्वी पुण्यात नोकरीनिमित्ताने दाखल झाला आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: