जाहिरात

2 टॅटू, 1 फोटो अन् खेळ खल्लास; यशश्री शिंदे हत्याकांडातील आतापर्यंतचा सर्वात मोठा ट्विस्ट 

यशश्री हत्याकांडातील अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत.

2 टॅटू, 1 फोटो अन् खेळ खल्लास; यशश्री शिंदे हत्याकांडातील आतापर्यंतचा सर्वात मोठा ट्विस्ट 
मुंबई:

यशश्री शिंदे हत्याकांडात (Yashshree Shinde murder case) नवनवे खुलासे होत आहेत. नव्या माहितीनुसार, यशश्री शिंदे हिच्या शवविच्छेदन अहवालात तिच्या शरीरावर दोन टॅटू आढळून आले आहेत. विशेष म्हणजे हा टॅटू दाऊद शेख याच्या नावाचे होता. मात्र हा टॅटू यशश्रीच्या संमतीने काढण्यात की यासाठी तिच्यावर जबरदस्ती करण्यात आली, याबाबत अद्याप खुलासा झालेला नाही. दाऊद शेखला अटक करून दोन दिवस उलटले आहेत. त्याच्या चौकशीत बऱ्याच गोष्टी स्पष्ट होऊ शकतात. लग्नाला नकार दिला म्हणून तिची हत्या करण्यात आल्याचं दाऊदकडून सांगितलं जात आहे. 

यशश्रीच्या वडिलांनी 2019 मध्ये आरोपी दाऊदविरोधात पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल केला होता. तो सुमारे दीड महिना तुरुंगात होता. त्यानंतर त्याचा अपघात झाला होता. सुमारे दीड महिना तो अंथरुणाला खिळून होता. प्रकृती सुधारल्यानंतर त्याने पीडितेशी पुन्हा संपर्क साधला आणि संभाषण सुरू केले. यशश्रीच्या वडिलांचा बदला घेण्यासाठी त्याने हत्येचा कट रचल्याची माहिती समोर येत आहे.

अन् आखला यशश्रीच्या हत्येचा कट...
आरोपी दाऊदला यशश्रीशी लग्न करून कर्नाटकात स्थायिक व्हायचं होतं. पण यशश्रीकडून नकार देण्यात आला होता. आरोपी दाऊद यशश्रीवर लग्नासाठी दबाव आणत होता. अनेकदा यशश्रीने त्याचा फोन ब्लॉक केला. त्यानंतर तो मोहसिनच्या फोनवरून तिला फोन करीत होता. आरोपी दाऊदकडे या दोघांचे काही खाजगी फोटो होते. ते फोटो कोणी पाहू नये अशी यशश्रीची इच्छा होती. मात्र आरोपीने तरुणीला तो फोटो सोशल मीडियावर टाकण्याची धमकी दिली.  यानंतर 24 जुलै रोजी जुईनगर रेल्वे स्थानकाजवळ तो तरुणीला भेटला. यानंतर आरोपीने तिला 25 जुलैला सतत फोन करून भेटायला बोलवलं. ती भेटायला तयार नव्हती, तेव्हा त्याने तो फोटो त्याच्या फेसबुकवर टाकला. फोटो पाहताच तिने पुन्हा भेटायला होकार दिला. आरोपींने पोलिसांना सांगितले की, भेटल्यावर यशश्रीने फेसबुकवरून फोटो डिलिट करण्यास सांगितले आणि त्याने फोटो डिलिट केला. यावेळी दोघांमध्ये बाचाबाची झाली आणि तरुणीनेही आपल्या मित्राला मदतीसाठी बोलावून आपण अडचणीत असून मदतीची गरज असल्याचे सांगितले. दरम्यान आरोपीने चाकूने यशश्रीची हत्या केली.आरोपी दाऊदने बंगळुरहून दोन चाकू आणले होते, त्यातील एक चाकू वापरून त्याने यशश्रीची हत्या केली.

नक्की वाचा - यशश्रीनंतर आणखी एकीचा बळी; विरोध केला म्हणून 14 वर्षीय मुलीसोबत भयंकर घडलं

हत्येनंतर दाऊदने काय केलं?
यशश्रीची हत्या केल्यानंतर आरोपीने उरणहून ट्रेनने पनवेल गाठले. त्याने मित्राला फोन करून काही पैसे मागितले, त्यानंतर त्याने पनवेल स्टेशनजवळील एटीएममधून एक हजार रुपये काढले. कळंबोली येथून ट्रॅव्हल बसने कर्नाटकातील गुलबर्गा येथील शाहपूरला बस पकडली. शहापूरमध्ये त्याने मोबाइल बंद करून आजीच्या घरी सोडला आणि नंतर पोलिसांच्या नजरेतून स्वत:ला वाचवण्यासाठी तो एका डोंगरावरून दुसऱ्या डोंगरावर जाऊ लागला. शेवटी पाच दिवसांनी 30 जुलै रोजी नवी मुंबई पोलिसांनी पहाटे त्याला पकडलं. पहाटे 5 वाजता त्याला शहापूरजवळील डोंगरावरून अटक करण्यात आलं.

हत्येच्या पाच दिवस आधी म्हणजेच 20 जुलै रोजी पनवेल न्यायालयाने आरोपी दाऊदविरुद्ध एनबीडब्ल्यू जारी केला होता. 2019 मध्ये दाखल झालेल्या POCSO खटल्याच्या तारखेला कोर्टात हजर न राहिल्यामुळे त्याच्याविरुद्ध हा NBW (अजामिनपात्र गुन्हा) जारी करण्यात आला होता. न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटलं होतं की, आरोपीविरुद्ध आरोप निश्चित करणे बाकी आहे आणि हे प्रकरण जुने आहे. तरीही तो बराच काळ न्यायालयात येत नाही, त्यामुळे त्याच्याविरुद्ध एनबीडब्ल्यू जारी करण्यात यावा. याप्रकरणी पुढील तारीख 12 ऑगस्ट ठेवण्यात आली होती.


 

Switch To Dark/Light Mode
Previous Article
पाली-खोपोली महामार्गावर अपघातांची मालिका; शाळेच्या बसला बाईकची धडक, तिघांचा जागीच मृत्यू
2 टॅटू, 1 फोटो अन् खेळ खल्लास; यशश्री शिंदे हत्याकांडातील आतापर्यंतचा सर्वात मोठा ट्विस्ट 
Woman knifes boyfriend's private parts after he refuses to marry her Thane Bhivandi
Next Article
लग्नास नकार देणाऱ्या प्रियकराच्या गुप्तांगावर प्रेयसीने केले चाकूने वार