जाहिरात
Story ProgressBack

अरूणाचल प्रदेश आणि सिक्कीममध्ये कोणाचं सरकार? विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू

ईशान्येकडील राज्य अरूणाचल प्रदेश आणि सिक्कीमच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल आज समोर येणार आहे.

Read Time: 2 mins
अरूणाचल प्रदेश आणि सिक्कीममध्ये कोणाचं सरकार? विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू
नवी दिल्ली:

ईशान्येकडील राज्य अरूणाचल प्रदेश आणि सिक्कीमच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल आज समोर येणार आहे. या दोन्ही राज्यातील मतमोजणीही सुरू आहे. त्यामुळे दोन्ही राज्यात कोणाचं सरकार स्थापन होणार, हे आज स्पष्ट होईल. अरूणाचल प्रदेशात मतमोजणी सकाळी 8 ऐवजी सकाळी 6 वाजता सुरू झाली. सर्वात आधी पोस्टल बॅलेटची मतं मोजली जातील. 

दोन्ही राज्यात भाजपचे 10 उमेदवारांची यापूर्वीच बिनविरोध निवड झाली आहे. आज 60 पैकी 50 विधानसभा मतदारसंघांचे निकाल समोर येतील. भाजपने 2019 मध्ये 41 जागांवर विजय मिळवला होता. यंदा भाजपने सर्व 60 जागांवर उमेदवार दिले आहेत. काँग्रेस 34 जागांवर निवडणुकीच्या मैदानात आहे. 

बिनविरोध निवड झालेल्यांमध्ये अरूणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांचाही समावेश आहे. ते चारपैकी तीन वेळा तवांग जिल्ह्याच्या मुक्तोमधून कोणत्याही आव्हानाशिवाय विजयी झाले आहेत. बिनविरोध निवड झालेल्यांमध्ये चौखममधून उपमुख्यमंत्री चाऊना मीन, इटानगरमधून तेची कासो, तलिहातून न्यातो डुकम आणि रोइंगमधून मुत्चू मीठी यांचा समावेश आहे. 

नक्की वाचा  - Maharashtra Exit Polls 2024 : NDA ची वाटचाल महाराष्ट्रात अडखळणार? दोन्ही आघाड्यांमध्ये काँटे की टक्कर

2019 च्या विधानसभा निवडणुकीत जेडीयूने 7 जागा, नॅशनल पीपल्स पार्टीने 5, काँग्रेसने ४ आणि पीपल्स पार्टी ऑफ अरूणाचलने एक जागेवर विजय मिळवला होता. दोन अपक्ष उमेदवारांनीही विजय मिळवला होता. सिक्कीममध्ये सत्ताधारी सिक्कीम क्रांतिकारी मोर्चेची लढत सिक्कीम डेमोक्रेटिक फ्रंटसह आहे. सत्ताधारी पक्ष सलग दुसऱ्यांदा विजेची अपेक्षा करीत आहे. राज्याच्या 32 विधानसभा जागांसाठी मतमोजणी सुरू आहे. दोन्ही पक्षांनी सर्व 32 जागांवर आपले उमेदवार उतरवले आहेत. भाजपचे 31 उमेदवार निवडणुकीच्या मैदानात आहेत. तर काही जागांवर आणि नवी पक्ष सीएपी-एसच्या 30 जागांसह मैदानात आहे. तर काँग्रेसने 12 जागांवर उमेदवार उतरवले आहेत. 

Switch To Dark/Light Mode
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination
Previous Article
Maharashtra Exit Polls 2024 : NDA ची वाटचाल महाराष्ट्रात अडखळणार? दोन्ही आघाड्यांमध्ये काँटे की टक्कर
अरूणाचल प्रदेश आणि सिक्कीममध्ये कोणाचं सरकार? विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू
exit poll 2024 see full list to all states lok sabha election exit poll
Next Article
एग्झिट पोल्समध्ये देशाची गॅरेंटी कुणाला? कोणत्या राज्यात किती जागा, पाहा संपूर्ण यादी
;