'सगळ्यांना माझी गरज लागते,पण...' विरारमधील राड्यानंतर हितेंद्र ठाकूर कोणा बरोबर?

सत्तेत आम्हाला नेहमीच महत्व होते, आहे आणि राहील असं वक्तव्य बविआचे प्रमुख हितेंद्र ठाकूर यांनी केला आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
विरार:

विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे संपुर्ण देशाचे लक्ष लागले आहे. कोणाला बहूमत मिळेल की नाही याची चर्चाही सुरू आहे. अशा वेळी अपक्ष आणि छोट्या पक्षांनाही भाव आला आहे. शिवाय काही छोटे पक्षही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे त्यांनी वेट अँण्ड वॉचची भूमीका घेतली आहे. निकाल लागल्यानंतर ते आपले पत्ते खोलतील. तशीच काहीशी रणनिती बहुजन विकास आघाडीचे प्रमुख हितेंद्र ठाकूर यांनी घेतली आहे. पण सगळ्यांनाच आपली गरज लागते असे सुचक वक्तव्यही त्यांनी या निमित्ताने केले आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

विरारमध्ये मतदानाच्या एक दिवस आधी भाजपचे राष्ट्रीय सरचीटणिस विनोद तावडे यांना पैसे वाटप करताना हितेंद्र ठाकूरांच्या बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी पकडले होते. असा दावा बविआने केला होता. त्यानंतर आता मतदान झाले आहे. सर्वांना निकालाची प्रतिक्षा आहे. निकाला काय लागतील हे ठाम पणे कोणालाही सांगता येत नाही. त्यामुळे आघाडी आणि युतीकडून आतापासूनच जुळवा जुळव सुरू झाली आहे. त्यात छोट्या पक्षांनाही महत्व प्राप्त झाले आहे. अशा वेळी बहुजन विकास आघाडीच्या हितेंद्र ठाकूर यांची भूमीका काय याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. 

ट्रेंडिंग बातमी - महायुती की महाविकास आघाडी? निकालाच्या एकदिवस आधी प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केली भूमिका

 मात्र हितेंद्र ठाकूर यांनी आपले सर्व पत्ते खुले केलेले नाहीत. त्यांना थांबा आणि पाहा अशी भूमीका घेतली आहे. पण त्यांनी काही संकेत मात्र नक्की दिले आहेत. ते म्हणाले सर्व पक्षात माझे मित्र आहेत. मी कधीही राजकारणात कोणाला शत्रू मानत नाही. निवडणुकीत आरोप-प्रत्यारोप होत असतात. त्यानंतर मात्र सर्वांनाच माझी गरज लागते असं सुचक वक्तव्य हितेंद्र ठाकूर यांनी केले आहे. शिवाय राजकारणात कोणीही कायमचा शत्रू नसतो असंही ते म्हणाले. शिवाय सत्तेत आम्हाला नेहमीच महत्व होते आहे आणि राहील असं ही त्यांनी सांगितलं. 

ट्रेंडिंग बातमी - बंडखोर अपक्ष उमेदवार समिर भुजबळांना महायुतीकडून संपर्क? भुजबळ म्हणाले...

माझ्या लोकांच्या हिताचा निर्णय आपण घेणार आहे. त्यांची कामं झाली पाहीजेत असं मला वाटतं. शिवाय सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेवून पुढे जात आहे. त्यामुळे त्यांचे हितही महत्वाचे आहे असं ते म्हणाले. आम्ही निवडणुकीच्या निकालाची प्रतिक्षा करत आहोत. निकाल लागल्यानंतर काय करायचे ते ठरवू. आम्हालाही निकालाची प्रतिक्षा आहे. त्यामुळे जो पक्ष सत्तेच्या जवळ असेल त्याच्या बरोबर जाणार असल्याचे संकेतही ठाकूर यांनी या निमित्ताने दिले आहेत. 

ट्रेंडिंग बातमी - 'पक्षाने वेळेवर धोका दिला, माझा अपमान केला' भाजप नेत्याची राजकीय संन्यासाची घोषणा

दरम्यान विरारमध्ये पैसे वाटण्याचा जो प्रकार झाला त्यावर ही हितेंद्र ठाकूर यांनी वक्तव्य केले आहे. ज्या हॉटेलमध्ये हा प्रकार घडला, ते हॉटेल हितेंद्र ठाकूर यांच्या मालकीचे असल्याचा आरोप तावडे यांनी केला होता. ते सर्व काही मॅनेज होतं असंही ते म्हणाले होते. त्यावर बोलताना हितेंद्र ठाकूर म्हणाले, काही तरी टाईमपास करायचं म्हणून तावडे असं बोलले असतील. त्यांना जर ऐवढच वाटत असेल तर त्यांनी ते हॉटेल विकत घ्यावं आणि माझ्या नावावर करावं असं आव्हान त्यांनी दिलं आहे. 

Advertisement