विधानसभा निवडणुकीचे वातावरण आता चांगले तापू लागले आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीत यांच्यात सत्ता संघर्ष सुरू आहे. राज्याची सत्ता काबीज करण्यासाठी आघाडी आणि युतीने जोर लावला आहे. मोदी, अमित शाह, राहुल गांधी, प्रियांका गांधी हे महाराष्ट्राच्या निवडणूक रिंगणात उतरले आहेत. शिवाय शरद पवार, उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांनीही प्रचाराचा धुरळा उडवून दिला आहे. अशा वेळी कोणाला किती जागा मिळणार याची चर्चा राज्यात ठिकठिकाणी रंगली आहे. त्यात आता भाजपचे राष्ट्रीय सरचिटणिस विनोद तावडे यांनी महायुतीला किती जागा मिळणार याचे आकडेच सांगितले आहे. शिवाय महायुतीतल्या भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवारांच्या वाट्याला किती जागा येतील हे ही सांगितले आहे. NDTV मराठीला दिलेल्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
विधानसभा निवडणुकीत महायुतीला पोषक वातावरण आहे. महायुतीच्या बाजूने जनमत असल्याचा दावा भाजप नेते विनोद तावडे यांनी केला आहे. लोकसभेला आघाडी आणि युतीच्या मतांमध्ये तेवढा फरक नव्हता. लोकसभेच्या तुलनेत विधानसभेला मतांचे विभाजन जास्त होणार आहे. त्याचा फरक निकालावर होईल असंही तावडे म्हणाले. शिवाय युती आणि आघाडीच्या राजकारणामुळे अपेक्षित जागा कोणत्याच पक्षाला लढता आल्या नाहीत हे सत्य आहे. त्यामुळेच मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाली आहे असे ते म्हणाले.
ट्रेंडिंग बातमी - शिवसैनिकाची बोटे छाटली, ठाकरेंनी त्यालाच स्टेजवर आणलं, पुढे काय झालं?
काँग्रेसला ही 150 जागा लढणे अपेक्षित होते पण तसे झाले नाही. भाजपला ही जास्त जागा लढता आल्या असत्या. पण तसे झाले नाही. बंडखोरांना थंड करण्यात भापजला यश आल्याचंही त्यांनी सांगितले. शिवाय 2029 ला भाजप महाराष्ट्रात स्वबळावर निवडणूक लढेल. त्यावेळी जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना संधी दिली जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका झाल्या नाहीत. त्यामुळे थेट जनतेशी संपर्क असलेले नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य सध्या नाहीत. त्याची मोठी उणिव या निवडणुकीत दिसून येते असेही तावडे म्हणाले.
ट्रेंडिंग बातमी - 'मोदी गॅरंटी नाही तर राज्यात फक्त ठाकरे गॅरंटी' उद्धव गरजले, मोदी- शाहंना सुनावले
त्रिशंकु विधानसभे येईल असे वाटत होते. पण तसे होताना दिसत नाही. सध्याची स्थितीही महायुतीसाठी पोषक असल्याचे विनोद तावडे यांनी सांगितले. त्यामुळे महायुतीला जवळपास 155 ते 160 जागा मिळतील असा अंदाज तावडे यांनी व्यक्त केला आहे. शिवाय त्यातील भाजपला जवळपास 90 ते 100 जागा मिळतील असा विश्वास त्यांनी वक्त केला. शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला 40 जागा येण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 20 ते 25 जागा मिळती अशी सध्याची स्थिती असल्याचे त्यांनी सांगितले. अजून प्रचाराला काही दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे परिस्थिती आणखी बदलू शकते असंही ते म्हणाले.
ट्रेंडिंग बातमी - 'मोदींना महाराष्ट्रातल्या जनतेने त्यांची जागा दाखवली' पवारांनी तोफ डागली
महायुतीचे सरकार येणार असं त्यांनी सांगितलं. शिवाय महाविकास आघाडीला 125 त्या जवळपास जागा मिळतील असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला आहे. महाविकास आघाडीत सर्वात मोठा पक्ष हा काँग्रेस असेल असंही ते म्हणाले. काँग्रेसनंतर सर्वात जास्त जागा या शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवडून येतील असंही ते म्हणाले. उद्धव ठाकरेंची शिवसेना तिसऱ्या क्रमांकावर राहील असही ते म्हणाले. विधानसभेच्या प्रचारासाठी अजून काही दिवस शिल्लक आहेत. त्यात काय घडामोडी घडतात, वारं कोणत्या दिशेनं फिरतं याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world