विधानसभा निवडणूक आता रंगात येवू लागली आहे. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. सर्वच पक्ष मतदारांना आकर्षीत करण्यासाठी आश्वासनं आणि गॅरंटी देत आहेत. आता उद्धव ठाकरे यांनी तर मोदी आणि शाहंना सुनावत महाराष्ट्रात फक्त ठाकरे गॅरंटी चालते असे ठणकावून सांगितले आहे. शिवाय आता मोदी शाहंना महाराष्ट्राची आठवण झाली. राज्यातले उद्योग पळवताना त्यांना महाराष्ट्र आठवला नाही का? असा प्रश्न करत उद्धव ठाकरे यांनी मोदी-शाह जोडीवर जोरदार हल्लाबोल केला. नांदेड जिल्ह्यातील लोहा कंधार मतदार संघात प्रचार सभे वेळी ते बोलत होते.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मोदी आणि शाह यांना आता महाराष्ट्र आठवत आहे. महाराष्ट्राला लुटायचं हेच त्यांचे काम होते. त्यांनीच सगळे उद्योग लुटून गुजरातला नेले असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला. आता निर्लज्जपणे महाराष्ट्रातल्या जनतेकडे मतं मागता. तुम्ही वाट्टेल ते कराल आणि तुम्हाला महाराष्ट्र मत देईल या भ्रमात राहू नका असा इशाराही ठाकरे यांनी दिला. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आणायचं आहे. जे मविआच्या विरोधात आहेत ते सर्व महाराष्ट्र द्रोही आहेत. हे सरकार सर्व सामान्य जनतेसाठी आणायचं आहे असंही ते म्हणाले.
ट्रेंडिंग बातमी - शिवसैनिकाची बोटे छाटली, ठाकरेंनी त्यालाच स्टेजवर आणलं, पुढे काय झालं?
भाजपने आता बटेंगे तो कटेंगे ही घोषणा दिली आहे. कोणाला सांगताय बटेंगे तो कटेंगे. कोणाला शिकवतायत बटेंगे तो कटेंगे असा सवाल उद्धव ठाकरे यांनी मोदी शाह यांना केला. तुमचा पक्ष फुटत चालला आहे. आधी तुम्हाला सर्वजण मोदी भाई छे... अमित भाई छे... असे म्हणायचे. पण आता तुमचेच लोक तुम्हाला छेछेछे... करायला लागले आहेत असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे. भाजपमध्ये खरा काळोख आहे. पण खरा प्रकाश शिवसेनेची मशाल आणणार आहे असे ठाकरे या वेळी म्हणाले.
ट्रेंडिंग बातमी - 'मोदींना महाराष्ट्रातल्या जनतेने त्यांची जागा दाखवली' पवारांनी तोफ डागली
भाजपची वाढ आमच्या मुळे झाली. पण आमच्याच उरावर हे माणसं बसवत आहेत असा आरोप ठाकरे यांनी यावेळी केला. अमित शाह यांच्याकडे दुसरे कोणते मुद्दे राहीले नाहीत. आदित्यला मुख्यमंत्री करायचं आहे असं ते मागेही म्हणाले होते. त्याचं उत्तर मी त्यांना लोकसभेलाच दिलं आहे. पण त्यांनी आता एक उत्तर द्यावं की त्यांची पंतप्रधान होण्याची इच्छा आहे की नाही? अमित शाह मुद्द्याचं बोल कामाचं बोला असंही ते म्हणाले. मोदींनी प्रचाराची सभा धुळ्याला घेतली. ते एक प्रकारे बरे झाले कारण महाराष्ट्रातील जनता त्यांना धुळ चारणार आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले.
ट्रेंडिंग बातमी - 'महाराष्ट्राला काँग्रेसचं ATM करु नका,' पंतप्रधान मोदींचं मतदारांना आवाहन
मविआ म्हणजे चाकं स्टेअरिंग नसलेली गाडी आहे असे पंतप्रधान मोदी म्हणाले. पण तुमच्या गाडीला भ्रष्टाचाराची चाकं लागली आहेत त्याचं काय? असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी केला. सध्या महायुतीच्या प्रचार सभांमध्ये बाळासाहेबांचे फोटो लावले जात आहेत. मोदींचा काही ठिकाणी दिसतो. अमित शाह यांचा तर दिसतच नाही. मोदी गॅरंटी आता राहीली नाही. नासकी, सडकी, गळकी अशी मोदी गॅरंटी महाराष्ट्रात चालणार नाही. महाराष्ट्रात फक्त एकच गॅरंटी चालते ती म्हणजे ठाकरे गॅरंटी असं यावेळी उद्धव ठाकरे यांनी मोदी शाह यांना ठणकावून सांगितले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world