जाहिरात

BMC Election 2026: NCPकडून MNSचा 'बदला'पूर, चिमुकली अत्याचार प्रकरण उजेडात आणणाऱ्या रणरागिणीचा मनसेला दे धक्का

BMC Election 2026: बदलापुरात राज ठाकरेंना मोठा धक्का. बदलापूर शाळेतील चिमुकलींवर अत्याचार प्रकरण उजेडात आणणाऱ्या रणरागिणीने साथ सोडली.

BMC Election 2026: NCPकडून MNSचा 'बदला'पूर, चिमुकली अत्याचार प्रकरण उजेडात आणणाऱ्या रणरागिणीचा मनसेला दे धक्का
"BMC Election 2026: राज ठाकरेंना आणखी एक धक्का"

BMC Election 2026: बदलापूरच्या शाळेतील चिमुकलींवरील अत्याचार प्रकरणाचा पर्दाफाश करणारी रणरागिणी संगीता चेंदवणकर यांनी अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलाय. संगीता चेंदवणकर यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षप्रवेशाचा कार्यक्रम मंगळवारी (6 जानेवारी) ठाणे शहरात पार पडला. मनसेसाठी हा मोठा धक्का मानला जातोय.  

कोण आहेत संगीता चेंदवणकर? 

ऑगस्ट 2024 रोजी बदलापुरातील एका शाळेमध्ये चिमुकलींवर झालेल्या अत्याचाराचे प्रकरण संगीता चेंदवणकर यांनी सर्वांसमोर आणलं होतं. पीडित कुटुंबीयांच्या पाठीशी चेंदवणकर खंबीरपणे उभ्या राहिल्या होत्या. बदलापुरातील आंदोलन देशभर गाजलं होतं. शाळेतील एका कंत्राटी सफाई कर्मचाऱ्याने चार वर्षांच्या दोन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर देशभरात संतापाची लाट पसरली होती. या अन्यायाविरोधात पालकांना एकत्र करण्यात आणि हे प्रकरण पोलिसांसह जनतेपर्यंत पोहोचवण्यात चेंदवणकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.  

यानंतर संगीता चेंदवणकर यांनी ठाणे जिल्ह्यातील मुरबाड मतदारसंघातून मनसेच्या तिकिटावर विधानसभा निवडणूक (वर्ष 2024) लढवली पण त्यांचा पराभवाचा सामना करावा लागला.

बदलापुरात मनसेला मोठा धक्का

पण ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत चेंदवणकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानं बदलापुरात मनसेला हा मोठा धक्का मानला जातोय. 

संगीता चेंदवणकर यांची पहिली प्रतिक्रिया

संगीता चेंदवणकर यांनी मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर पत्रकारांशी बातचित केली. यावेळेस त्या म्हणाल्या की, "मला जनतेची सर्वोत्तम सेवा करायची होती, पण अलिकडे मी ते समाधानकारकपणे करू शकले नाही, असे मला वाटले. मी राष्ट्रवादी कुटुंब निवडलंय, जिथे मी अधिक चांगले काम करू शकते,असा मला विश्वास आहे".

BMC ELection 2026: संतोष धुरी स्वार्थी! वरळीत बसलेल्या धक्क्यानंतर मनसेची पहिली प्रतिक्रिया

(नक्की वाचा: BMC ELection 2026: संतोष धुरी स्वार्थी! वरळीत बसलेल्या धक्क्यानंतर मनसेची पहिली प्रतिक्रिया)

स्थानिक राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आशिष दामले यांनी संगीता चेंदवणकर यांचे स्वागत केले आणि बदलापूरची "रणरागिणी" म्हणून त्यांना संबोधलंय. आशिष दामले म्हणाले की, संगीता यांनी सातत्याने अन्यायाविरोधात लढा दिलाय आणि नागरिकांचे महत्त्वपूर्ण मुद्दे मांडले आहेत. ठाण्याच्या विकासासाठी आम्ही टीम म्हणून एकत्र काम करत असल्याने पक्षात त्यांचा प्रवेश होणे ही आमच्यासाठी एक मोठी गोष्ट आहे."

BMC Election 2026 FAQs: मुंबईसह 29 मनपांच्या निवडणुका कधी? EVM, ओळखपत्र, मतदार यादीसह 35 प्रश्नांची उत्तरं एका क्लिकवर वाचा

(नक्की वाचा: BMC Election 2026 FAQs: मुंबईसह 29 मनपांच्या निवडणुका कधी? EVM, ओळखपत्र, मतदार यादीसह 35 प्रश्नांची उत्तरं एका क्लिकवर वाचा)

(Content Source PTI)

Listen to the latest songs, only on JioSaavn.com