Harshwardhan Sapkal on unopposed Election : महानगरपालिका निवडणूक होण्यापूर्वी राज्यातील कित्येक उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. आधी ही बाब सन्मानपूर्वक मानली जात होती, मात्र आता त्याकडे संशयाने पाहिलं जात असल्याचं मत महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी NDTV नेटवर्कतर्फे आयोजित केलेल्या 'NDTV BMC Power Play' या विशेष कार्यक्रमात मांडलं.
सपकाळ पुढे म्हणाले, उमेदवार बिनविरोध जिंकत असेल तर त्यामागे अनेक गोष्टी कारणीभूत आहेत. विरोधकांना जेरीस आणलं जात आहे. त्यांना धमक्या दिल्या जात आहेत. केसेसची भीती दाखवली जात आहे. भय आणि लालसा या दोन्हीचा वापर करून विरोधकांना आपल्याकडे घेतलं जात आहे. यामुद्द्याल जोडून ते पुढे म्हणाले, विरोधक विकले जातात हे लपून राहिलेलं नाही, मात्र सत्ताधारी खरेदी करतात त्यावर चर्चा का होत नाही? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.
फडणवीसांचा बुलडोजर सैराट निघालाय...
भाजपची आधीच केंद्रात सत्ता आहे. महाराष्ट्रातही पक्ष मजबूत आहे, अशा परिस्थितीतही त्यांची भूक कमी होत नाही. त्यांना गावपातळीवरही सत्ता हवीये. पक्ष वाढवण्यात अडचण नाही. मात्र ज्या पद्धतीने हे सर्व केलं जात आहे ते लोकशाहीसाठी घातक आहे. देवेंद्र फडणवीसांचा बुलडोजर सैराट निघालाय. मूल्य, सभ्यता, संस्कृती, वारसा, लोकशाहीला हटवत पुढे निघालाय. याबाबत बोलताने ते म्हणाले, अनेकदा काँग्रेसला अनेक गोष्टी सांगितल्या जातात. आंदोलन करा, कोर्टात जा मात्र सद्यस्थितीत कोर्टात जाणं हा एक ट्रॅप झाल्या, माफ करा परंतू तिथल्या विश्वासार्हतेवर संशय निर्माण होता.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world
