अमोल सराफ
सध्या राज्यात नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकीचे मोठ्या प्रमाणात वारे वाहत आहेत. या पार्श्वभूमीवर मित्र पक्षातील उमेदवार देखील फोडण्याची स्पर्धा लागली आहे. काही इच्छुकांनी तर आपला मुळ पक्ष सोडून सत्तेत असलेल्या पक्षात प्रवेश घेतला आहे. त्यात मग कुणी भाजपमध्ये तर कुणी शिंदेंच्या शिवसेनेत जात आहे. तर काहींनी राष्ट्रवादी अजित पवार गटात जाणे पसंत केलं आहे. बुलढाण्यात मात्र पत्नीली जिवंत जाळण्याचा आरोप असलेला आणि सध्या जेलची हवा खात असलेल्या आरोपीलाच थेट पक्षात प्रवेश दिला आहे. ऐवढं कमी की काय तर त्याला उमेदवारी ही देवू केली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
ही घटना घडली आहे बुलडाणा जिल्ह्यात घडली आहे. रिकी काकडे उर्फ विशाल काकडे याच्यावर पत्नीला जिवंत जाळण्याचा आरोप आहे. रिकी हा युवा काँग्रेसचा चिखली शहर अध्यक्ष होता. त्याच्यावर पत्नी नमिता काकडे यांना जिवंत जाळण्याचा आरोप आहे. याबाबतची तक्रार चिखली पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली होती. तक्रार दाखल झाल्यानंतर नऊ नोव्हेंबरला चिखली पोलिसांनी रिकी काकडे याला अटक केली. या घटनेचा तपास ठाणेदार भूषण गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कड हे करीत आहे.
या आरोपात विकी हा सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. मात्र यानंतर मोठ्या नाट्यमय घडामोडी होत आहेत. विशाल उर्फ विकी काकडे याने थेट राष्ट्रवादी अजित पवार गटात तडकाफडकी प्रवेश घेतला आहे. ऐवढच नाही तर जेलमध्ये असताना त्याने आपला नगरपरिषद करता उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून त्याला उमेदवारी ही देण्यात आली आहे. त्याने पोलीस संरक्षणात 17 नोव्हेंबर रोजी आपला उमेदवारी अर्ज ही दाखल केला आहे.
निवडणूक उमेदवारांच्या यादीत त्याचे नाव बाहेर येतात एकच खळबळ माजली आहे. यानंतर राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्यावतीने देखील सावरासावर सुरू झाली आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते जिल्हाध्यक्ष नाझीर काझी यांनी हा एक प्रकारे षडयंत्र असल्याचं NDTV मराठी सोबत बोलताना सांगितलं. मात्र एका व्यक्तीवर गंभीर आरोप होतो. त्याला त्यामध्ये जेलमध्ये ही जावं लागतं. तोच व्यक्ती जेलमध्ये असताना एका दुसऱ्या पक्षात प्रवेश ही करतो. ऐवढच नाही तर त्या पक्षाची उमेदवारी ही मिळवतो. उमेदवारी अर्ज ही दाखल करतो. हे कसं घडलं याचीच चर्चा सध्या जिल्ह्यात सुरू आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world