संजय तिवारी, प्रतिनिधी
Chhatrapati Sambhajinagar Lok Sabha Constituency : छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुतीसमोर गंभीर डोकेदुखी निर्माण झाली आहे. रोजगार हमी योजना मंत्री संदिपान भुमरे यांची महायुतीचे उमेदवार म्हणून घोषणा झालीय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी ही घोषणा केली. मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केल्यानंतर मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील नाराज झाले आहेत. पाटील संभाजीनगरमधून निवडणूक लढण्यास उत्सुकआहेत. पाटील यांनी आज (सोमवार, 22 एप्रिल) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या राहत्या घरी भेट घेतली. या भेटीनंतर पाटील यांनी गंभीर इशारा दिल्यानं महायुतीची डोकेदुखी वाढलीय.
काय म्हणाले पाटील?
(नक्की वाचा : अकोल्यात मोदींच्या नावानं मत मागणारे कोण आहेत 'हे' हिंदुत्ववादी? )
आश्वासन मिळावं म्हणून ही भेट नव्हती. तर, मतदारसंघाची काय स्थिती आहे हे पुन्हा एकदा तपासलं पाहिजे यासाठी ही भेट होती. मला महायुतीनं उमेदवारी मिळाली तर मी ही जागा लढवणार. उमेदवारी मिळाली नाही तरीही माझ्या ताकदीनं निवडणूक लढवणार असा इशारा पाटील यांनी यावेळी दिला. या जागेवर मी इच्छूक आहे, त्यामुळे आता महायुतीनं ठरवावं. आजची चर्चा सकारात्मक झाली, असं पाटील यांनी स्पष्ट केलं.
संभाजीनगरमध्ये काय आहे समीकरण?
छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना यापूर्वीच उमेदवारी जाहीर झालीय. महायुतीचा उमेदवार कोण? हा तिढा शनिवारी सुटला. शिवसेनेकडून संदिपान भुमरे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. एमआयएमकडून विद्यमान खासदार इम्तियाज जलील निवडणूक लढवतायत. या तिरंगी लढतीमध्ये विनोद पाटील यांनीही दावेदारी सादर केल्यानं नवा ट्वि्स्ट निर्माण झाला
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world