विधानसभा निवडणुकीचा प्रचार सध्या जोरात सुरू आहे. प्रत्येक उमेदवार जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यातून गावभेटी, सभा, रोड शो, दारोदार जाऊन प्रचार केला जात आहे. त्यातून आरोप प्रत्यारोप होतच आहेत. शिवाय गेल्या पाच वर्षात काय केलं आणि पुढील पाच वर्षात काय करणार याची आश्वासन दिले जात आहेत. तर काही उमेदवारांना जनतेच्या नाराजालाही सामोरं जावं लागत आहेत. त्या पैकीच एक आहेत किनवटचे विद्यमान आमदार भिमराव केराम. आमदार साहेब गावात येत नाहीत. यावर केराम यांनी एक वक्तव्य केलं आहे. त्याची चर्चा सध्या मतदार संघात जोरदार होत आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
भाजपने नांदेड जिल्ह्यातील किनवट मतदार संघातून विद्यमान आमदार भिमराव केराम यांना उमेदवारी दिली आहे. सध्या त्यांचा प्रचार जोरात सुरू आहे. त्यांच्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी ही सभा घेतली. शिवाय पंकजा मुंडे ही त्यांच्या प्रचारासाठी आल्या होत्या. त्यावेळी गावातल्या लोकांनी आमदार साहेब गावात येत नाहीत असे म्हटले. त्यावर रोज-रोज गावात येऊन तुमचे काय मुके घ्यायचे का? असे वक्तव्य केले आहे. विशेष म्हणजे यावेळी व्यासपीठावर पंकजा मुंडे उपस्थित होत्या.
भाजपचे नांदेड जिल्ह्यातील किनवटचे आमदार भीमराव केराम यांनी हे वक्तव्य केले आहे. विशेष म्हणजे भाजप नेत्या आमदार पंकजा मुंडे व्यासपीठावर उपास्थित असताना आमदार भीमराव केराम यांनी हे वक्तव्य केले. केराम यांच्या प्रचारासाठी बोधडी येथे पंकजा मुंडे यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. केराम गावात फिरकले नाही अशी ओरड होत असते.
(नक्की वाचा- अमित ठाकरेंची विकासाची 'ब्लू प्रिंट'! आमदार झाल्यास माहीमकरांसाठी कोणकोणती कामे करणार?)
यावर बोलताना आमदार भीमराव केराम यांची जीभ घसरली. त्यांनी हे बेताल वक्तव्य केले. गावात येऊन काय मुके घ्यायचे काय असा प्रश्नच त्यांनी उपस्थितांना केला. मंत्रालयात वेळ देऊन गावासाठी निधी आणण्याचे काम मी करतो. असे केराम पुढे म्हणाले. आता या वक्तव्यावरून केराम यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. त्यांनी मुका घेण्याचं केलेलं वक्तव्य सध्या चर्चेचा विषय ठरलं आहे. शिवाय त्यांच्या वक्तव्याचा व्हिडीओ ही सध्या व्हायरल होत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world