जाहिरात

Delhi Election Result: दिल्लीत 'आप'चे धुरंधर आपटले! अरविंद केजरीवाल, मनिष सिसोदिया पराभूत

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा दारुण पराभव झाला आहे. भाजपच्या परवेशसाहेब सिंग यांनी त्यांचा पराभव केला आहे, तर उपमुख्यमंत्री मनिष सिसोदियाही पराभवाच्या छायेत आहेत. 

Delhi Election Result: दिल्लीत 'आप'चे धुरंधर आपटले! अरविंद केजरीवाल, मनिष सिसोदिया पराभूत

Delhi Assembly Election 2025: दिल्ली विधानसभा निवडणुकांचे निकाल हाती येत असून भारतीय जनता पक्षाने जोरदार मुसंडी मारली आहे. या विधानसभा निवडणुका निकालामध्ये आम आदमी पक्षाला सर्वात मोठा  हादरा बसला असून पक्षाचे प्रमुख, दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा दारुण पराभव झाला आहे. भाजपच्या परवेशसाहेब सिंग यांनी त्यांचा पराभव केला आहे, तर उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांचाही पराभव झाला आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

राजधानी दिल्लीमधील 70 विधानसभा मतदार संघांचे आज निकाल जाहीर होत आहेत. या विधानसभा निवडणुकीत मतदारांनी भारतीय जनता पक्षाच्या पारड्यात कौल दिला असून आम आदमी पक्षाला स्पष्टपणे नाकारल्याचे दिसत आहे. आम आदमी पक्षातील अनेक धुरंधर नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे, यामध्ये पक्षाचे सर्वेसर्वा माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचाही समावेश आहे. 

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा दारुण पराभव झाला आहे. भाजपच्या परवेशसाहेब सिंग यांनी त्यांचा पराभव केला आहे. अरविंद केजरीवाल यांचा जवळपास 1200 मतांनी पराभव झाला. अरविंद केजरीवाल कलांमध्ये सुरुवातीपासूनच पिछाडीवर होते. मतमोजणीच्या काही तासांना अरविंद केजरीवाल यांनी किंचिंत आघाडी घेतली होती. मात्र ती आघाडी फार काळ टिकली नाही. परवेश वर्मा आणि अरविंद केजरीवाल यांच्यात अटीतटीची लढत दिसली. अखेर परवेश वर्मा यांनी बाजी मारली.

Delhi Election Results 2025 : दिल्लीचा मुख्यमंत्री कोण होणार? 'या' नावांची सर्वाधिक चर्चा

दुसरीकडे आपला दुसरा सर्वात मोठा धक्का बसला आहे. दिल्लीचे माजी ुमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांचाही या निवडणुकीत दारुण पराभव झाला आहे. मनिष सिसोदिया हे जंगपुरा मतदारसंघातून ते निवडणूक लढवत होते. भारतीय जनता पक्षाचे उमेदवार तरविंदर सिंह मारवाह यांनी त्यांचा अवघ्या 600 मतांनी पराभव केला.