Voter ID Mobile Number Registration Process: मतदान हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार तसेच प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य देखील आहे. त्यामुळेच देशातील प्रत्येक नागरिकांसाठी मतदार ओळखपत्र हे एक महत्त्वाचे दस्तऐवज आहे. फक्त मतदान करण्यासाठीच नाही तर, भारताचा नागरिक म्हणूनही प्रत्येकाकडे मतदान ओळखपत्र असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर अनेक शासकीय, खाजगी कागदपत्र काढण्यासाठी देखील मतदान ओळखपत्राची गरज लागते.
(नक्की वाचा: घरबसल्या करता येणार मतदान; जाणून घ्या कोण असणार पात्र आणि कशी आहे प्रक्रिया?)
मतदान ओळखपत्र मोबाईल नंबरशी लिंक असणं गरजेचं आहे. कारण जर कधी मतदान ओळखपत्र हरवले तर मोबाईल नंबर लिक असल्याने पुन्हा नवीन ओळखपत्र काढण्याची गरज भासणार नाही. नंबर लिंक असेल तर तुम्ही ते ऑनलाइन डाउनलोड करू शकता. इतकच नाही तर, तुमचा मोबाईल नंबर तुमच्या मतदार ओळखपत्राशी लिंक केल्याने व्होटिंग कार्डशी संबंधित माहिती ऑनलाइन अपडेट करणं खूप सोपं होतं.
मतदार ओळखपत्राशी मोबाइल नंबर लिंक करणे अगदी सोपे आहे. घरबसल्या मोबाइल किंवा लॅपटॉपच्या सहाय्याने मतदान ओळखपत्राशी मोबाइल नंबर लिंक करता येतो. जी प्रक्रिया पूर्णपणे विनामूल्य आहे.
(नक्की वाचा: घरबसल्या मतदार यादीत नाव नोंदवा, या सोप्या स्टेप्स फॉलो करा)
मतदार ओळखपत्राला मोबाईल नंबर लिंक कसं कराल?
सर्वप्रथम ऑफिशियल नॅशनल वोटर्स सर्व्हिस या वेबसाईटला https://www.nvsp.in भेट द्या.
त्यानंतर मोबाईल नंबर, ईमेल, पासवर्ड व कॅप्चा कोड भरून लॉग इन करा.
नवीन युजर असल्यास साइन अप करून मोबाईल नंबर, ईमेल व कॅप्चा कोड टाकून पुढे जा.
त्यानंतर तुम्हाला एक ओटीपी मिळेल. तो ओटीपी टाकल्यानंतर समोर नवीन पेज दिसेल.
फॉर्ममध्ये आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक आणि इतर आवश्यक माहिती भरून तो फॉर्म सबमिट करा.
ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मोबाईल क्रमांक 48 तासांच्या आत मतदार ओळखपत्राशी जोडला जातो.
तर अशाप्रकारे तुम्ही तुमचे मतदार ओळखपत्र सहजपणे तुमच्या मोबाईल नंबरसोबत लिंक करू शकता. मोबाईल नंबर तुमच्या मतदार ओळखपत्राशी लिंक केल्याने, मतदार ओळखपत्राबाबत समस्या वारंवार उद्भवत नाहीत. मोबाइल नंबर लिंक केला असल्याने मतदार ओळखपत्र अगदी सहज पुन्हा एकदा प्राप्त करणं शक्य होतं. यासोबतच, मतदार यादीतील माहिती अपडेट करणे आणि त्यात काही बदल करणे सुद्धा यामुळे अधिक सोपे होते.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world