Sanjay Pugalia Analysis: निवडणूक हरणं कुणी राहुल गांधींकडून शिकावं, भाजपा, संघही मानेल गांधींचे आभार

Maharashtra Election Result 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक राहुल गांधी फेल गेल्याचा सर्वात मोठा पुरावा आणि उदाहरण म्हणून लक्षात राहणार आहे. 

जाहिरात
Read Time: 4 mins
महाराष्ट्रात ज्या ठिकाणी राहुल गांधींनी प्रचार केला तिथं पक्षाचा सुपडा साफ झाला आहे.
मुंबई:

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल अनेक कारणांमुळे ऐतिहासिक आहेत. महाराष्ट्रात सर्वात शक्तीशाली पक्ष होण्याचं भाजपाचं लक्ष्य होतं. ते लक्ष्य आता पूर्ण झालं आहे. भाजपानं या आव्हानात्मक निवडणुकीत मराठा आणि गैर मराठा मतदारांना एकत्र आणण्याचं काम केलं आहे. आत्तापर्यंत जाहीर झालेल्या निवडणूक निकालात भाजपाचा स्ट्राईक रेट 85 ते 90 टक्के आहे. मतदानाची टक्केवारी देखील जवळपास 50 टक्के होण्याची शक्यता आहे. हे ऐतिहासिक आहे. 

महाराष्ट्रात स्वत:चा दबदबा वाढवण्यासाठी भाजपानं गेल्या चार-पाच वर्षात ज्या चाली रचल्या त्या यशस्वी झाल्या. शिंदेंना शिवसेनेपासून वेगळे करणे, अजित पवारांना साथ देणे, शिंदेंमा महत्त्व देणे या भाजपाच्या चाली यशस्वी झाल्या. त्याचबरोबर एका बाजूला विकास आणि दुसरीकडं महिलांची मतं मोठ्या प्रमाणात मिळवण्यात पक्षाला यश मिळालं. तसं पाहिलं तर भाजपालाही इतक्या यशाची अपेक्षा नसेल.

शिंदेचं काय होणार?

महाराष्ट्रात स्वबळावर बहुमताच्या जवळ आलेला भाजपा मित्रपक्षांना भाव देणार का? हा प्रश्न आता विचारला जात आहे. भाजपानं मोठ्या फरकानं विजय मिळवल्यानंतर आघाडीच्या धर्माचं पालन केलंय, असा इतिहास आहे. त्यामुळे आगामी काळातही भाजपानं त्यांच्या मित्रपक्षाचा सन्माम केला तर त्याचं आश्चर्य वाटायला नको.

( नक्की वाचा : Maharashtra Election Result : महायुतीच्या दिग्विजयात RSS चं मोठं योगदान, वाचा संघानं कसा केला प्रचार? )
 

या निवडणुकीनंतर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनाही भाजपासोबत राहणे आणि त्यांच्यातील विश्वासाचे संबंध कायम राखण्याची गरज आहे. आता महायुतीमध्ये शिंदेंची फारशी गरज नसली तरी भाजपा हा नेहमी दूरचा विचार करुन काम करणारा पक्ष आहे. महाराष्ट्रात सीनिअर आणि ज्युनिअर पार्टनर कोण? यावर आत्तापर्यंत चर्चा होत असे. पण, आता भाजपा मोठा पक्ष असल्याचं सिद्ध झालंय. त्यामुळे मित्र पक्षांशी समन्वय ठेवण्याच्या भाजपाच्या धोरणात बदल होईल, असं वाटत नाही. सत्ता वाटपाचाही एक चांगला फॉर्म्युला समोर येण्याची शक्यता आहे. 

Advertisement

भाजपानं राज्यात तिसऱ्यांदा 100 पेक्षा जास्त जागा जिंकल्या आहेत. त्याचबरोबर भाजपानं राज्यात पहिल्यांदाच इतक्या जागा जिंकल्या आहेत, त्यामुळे देखील हा विजय ऐतिहासिक आगे. NDA च्या मतांची टक्केवारी जवळपास 50 टक्के आहे. त्यामध्ये भाजपाचा हिस्सा 25 टक्क्यांपर्यंत असेल, तर तो ऐतिहासिक नंबर आहे. या मतांचं प्रामाणिकपणे विश्लेषण केलं तर मुख्यमंत्रीपदाचा पहिला हक्क भाजपाचा आहे. त्यामुळे शिंदेंना माघार घ्यावी लागेल. त्यांनी आनंदानं मुख्यमंत्रीपदाची खूर्ची सोडली तरी आश्चर्य वाटायला नको.

( नक्की वाचा : Maharashtra Election Result 2024 : ते पुन्हा आले ! फडणवीसांच्या दमदार यशाचं रहस्य काय? )
 

विरोधी पक्षासाठी धडा

ही निवडणूक विरोधी पक्षाच्या नेत्यांना धडा आहे. भाजपाला दलित आणि मागासवर्गीयांची मतं मिळणार का? हा प्रश्न लोकसभा निवडणुकीनंतर विचारला जात होता. संविधानाच्या नावावर जी दलित मतं भाजपापासून दुरावली? त्याचं काय होणार? महाराष्ट्रात हे सर्व प्रश्न गैरलागू असल्याचं सिद्ध झालंय.

Advertisement

भाजपा, पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शाह, संघ, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांनी ज्या पद्धतीनं रणनीती बनवली, निवडणुकी विरोधकांना कशी धूळ चारली हा पराभूत नेत्यांसाठी पीएचडीचा विषय व्हायला हवा. 

ही निवडणूक काँग्रेस पक्षासाठी सर्वात मोठा धडा आहे. निवडणूक कशी हरवी हे राहुल गांधींकडून शिकावं. निवडणूक प्रचाराच्या दरम्यान राहुल गांधी यांनी काय सांगितलं होतं, हे आज क्वचितच कुणाला आठवत असेल. महाराष्ट्र एकोकाळी काँग्रेसचा गड होता. हा गढ आता उद्धवस्त झाला आहे. या निवडणुकीत शरद पवारही होते. त्यांच्यामुळे काँग्रेस किमान निवडणूक लढवू शकली, अन्यथा त्यांची क्षमता काय आहे, हे सर्वांना माहिती आहे. 

Advertisement

काँग्रेसकडं पराभवाची कला

सोशल मीडियावर ट्रोलर्सचे असलेले मुद्दे राहुल गांधी मांडत होते. विरोधी पक्षनेता जर स्वत:च ट्रोल बनला असेल, एकाच मुद्याचा पक्ष बनेल, संपूर्ण मीडियात सनसनाटी निर्माण करण्याचा प्रयत्न करेल, आणि त्यानंतर महाराष्ट्र हातामधून कसा गेला, यावर विचार करत बसेल तर परिणाम काय असेल हे वेगळं सांगण्याची गरज नाही. महाराष्ट्रानं राहुल गांधी आणि काँग्रेसला मोठा धडा शिकवला आहे. 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय असलेला विदर्भ एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. भाजपाचं विदर्भात अस्तित्व नव्हतं. पण, काँग्रेसला पराभवाची कला छान जमते. विदर्भातील पक्षाची अवस्था हे त्याचं मोठं उदाहरण आहे. 

( नक्की वाचा : Maharashtra Election Result : लोकसभेत कमावलं, पण विधानसभेत गमावलं ! काँग्रेसचं नेमकं काय चुकलं? )
 

काँग्रेसला प्रश्न

काँग्रेस पक्षानं महाराष्ट्रापेक्षा जास्त शक्ती वायनाडमध्ये का लावली ? हा प्रश्न आहे. वायनाडमध्ये काँग्रेसनं यापूर्वीही निवडणूक जिंकली होती. पण, तरीही काँग्रेसचं पूर्ण केडर तिथं नेत्यांना स्वत:चा चेहरा दाखवण्याचा प्रयत्न करत होते. या सर्व कारणांमुळेच महाराष्ट्रात काँग्रेसचा सपाटून पराभव झाला. ही काँग्रेस उद्धवस्त होण्याची घटना आहे. राहुल गांधी सपशेल नापास झाल्याचा संदेश या जनादेशामध्ये दडला आहे. 

काँग्रेस बीट कव्हर करणारा जुना रिपोर्टर म्हणून मी याबाबत काही सांगू शकतो. राहुल गांधी ज्या मार्गानं राजकारण करत आहेत ते कटकारस्थानाचं राजकारण आहे. ट्रोल पॉलिटिक्स आहे. हे राजकारण मतं देणारं नाही. खऱ्या प्रश्नांपासून लोकांचं लक्ष विचलित केल्याबद्दल भाजपा आणि संघाचं नेतृत्त्व राहुल गांधींचे आभार मानतील. ही निवडणूक राहुल गांधी फेल गेल्याचा सर्वात मोठा पुरावा आणि उदाहरण म्हणून लक्षात राहणार आहे.