जाहिरात

काँग्रेसच्या दिग्गजांचे एक-एक गड कोसळले, लोकसभेत हिरो विधानसभेत झिरो!

मागिल विधानसभेला जिंकलेल्या जागाही काँग्रेसला कायम ठेवता आलेल्या नाहीत.

काँग्रेसच्या दिग्गजांचे एक-एक गड कोसळले, लोकसभेत हिरो विधानसभेत झिरो!
मुंबई:

लोकसभा निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरलेला काँग्रेस विधानसभेत मात्र ती कामगिरी करू शकला नाही. लोकसभेत हिरो ठरलेला पक्ष विधानसभेत मात्र झिरो ठरला आहे. मागिल विधानसभेला जिंकलेल्या जागाही काँग्रेसला कायम ठेवता आलेल्या नाहीत. येवढेच काय तर काँग्रेसच्या दिग्गजांनाही पराभवाचा फटका सहन करावा लागला आहे. काँग्रेसचे अभेद्य असलेले गडही या निवडणुकीत पत्त्या सारखे कोसळले आहेत. हा काँग्रेससाठी फार मोठा धक्का मानला जात आहे. लोकसभेतल्या यशानंतर विधानसभेत सत्ता स्थापनेची स्वप्न काँग्रेस पाहात होती. पण त्यांचे हे स्वप्न धुळीला मिळालं. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा सुपडा साफ झाला आहे. लोकसभेत मिळालेल्या यशाच्या लाटेवर स्वार झालेल्या काँग्रेसला विधानसभेतही यश मिळेल असं वाटत होतं. पण त्यांचा हा अंदाज चुकला. याच फटका इतका मोठा होता की काँग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना पराभवाचा झटका सहन करावा लागला. सलग आठ वेळा विजय मिळवलेल्या बाळासाहेब थोरात यांना त्यांच्या संगमनेर विधानसभा मतदार संघात यावेळी मात्र पराभव स्विकारावा लागला. शिवसेनेच्या अमोल खटाळ यांनी थोरातांचा तब्बाल 10 हजार मतांच्या फरकाने पराभव केला. काँग्रेसचा अभेद्य गड यावेळी ढासळला. 

ट्रेंडिंग बातमी - पाडा पाडा पाडा! असं पवारांनी ज्या मतदार संघात सांगितलं, तिथं काय झालं?

 बाळासाहेब थोरातां प्रमाणेच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनाही पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे. कराड दक्षिण हा काँग्रेसचा गड राहीला आहे. इथून काँग्रेसने कधी पराभव पाहीला नाही. यावेळी पहिल्यांदाच या गडालाही तडा गेला. भाजपच्या अतूल भोसले यांनी पृथ्वीराज चव्हाण यांचा तब्बल 38 हजार मतांनी पराभव झाला आहे. काँग्रेससाठी हा दुसरा मोठा झटका आहे. या शिवाय भोर विधानसभा मतदार संघातून संग्राम थोपटे यांना ही पराभव स्विकारावा लागला आहे. थोटपे यांचा हा गड समजला जातो. त्याच बरोबर धुळे ग्रामिण विधानसभा मतदार संघातून कुणाल पाटील यांना अनपेक्षित पराभव सहन करावा लागला आहे.   

ट्रेंडिंग बातमी - दिलीप वळसे पाटील हरलेली बाजी जिंकले, तुतारी - पिपाणीच्या घोळ पथ्थ्यावर

विदर्भातून आलेले निकालही धक्कादायक आहे. काँग्रेसने विदर्भातू अशा निकालाची कधी अपेक्षा केली नसेल. सावनेर हा काँग्रेसचा विदर्भातील अभेद्य गड होता. अनेक वर्ष या मतदार संघातून सुनिल केदार हे प्रतिनिधीत्व करतात. पण या वेळी त्यांनी आपल्या पत्नीला मैदानात उतरवले होते. पण त्यांच्या पत्नीला अनुजा केदार यांचा पराभव भाजपच्या आशिष देशमुख यांनी 22 हजार पेक्षा जास्त मतांनी केला आहे. केदार आणि काँग्रेस यांच्यासाठी हा मोठा धक्का समजला जात आहे. हक्काची जागा काँग्रेसने गमावली आहे. माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनाही तिवसा मतदार संघातून धक्का बसला आहे.  या शिवाय अक्कलकूव्याची काँग्रेसची पारंपारीत जागा काँग्रेस राखू शकला नाही. काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि माजी मंत्री के. सी. पाडवी यांना पराभव स्विकारावा लागला. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com