जाहिरात

Arvind Kejriwal Viral Video : 'आप'च्या पराभवानंतर अरविंद केजरीवालांचा 'तो' व्हिडीओ प्रचंड व्हायरल

Arvind Kejriwal Video Viral : नवी दिल्ली मतदारसंघात भाजपच्या परवेश वर्मा यांनी आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांचा 4089 मतांनी पराभव केला. निवडणूक निकालादरम्यान अरविंद केजरीवाल यांचा एक जुना व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे.

Arvind Kejriwal Viral Video : 'आप'च्या पराभवानंतर अरविंद केजरीवालांचा 'तो' व्हिडीओ प्रचंड व्हायरल

अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाच्या दिल्लीतील सत्तेला भाजपने सुरुंगला लावला आहे. भाजपने जोरदार कामगिरी करत आम आदमी पक्षाला 10 वर्षांनी सत्तेतून खाली खेचलं. भाजपने आपच्या धुरंधर नेत्यांनाही घरी बसवलं आहे. अरविंद केजरीवाल, मनिष सिसोदिया, सत्येंद्र जैन, सौरभ भारद्वाज यांसारखे दिग्गज या निवडणुकीत पराभूत झाले आहेत. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

नवी दिल्ली मतदारसंघात भाजपच्या परवेश वर्मा यांनी आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांचा 4089 मतांनी पराभव केला. निवडणूक निकालादरम्यान अरविंद केजरीवाल यांचा एक जुना व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. ज्यामध्ये केजरीवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आव्हान देताना दिसत आहेत. व्हिडिओ केजरीवाल यांच्या स्वतःच्या प्रोफाइलवरून शेअर करण्यात आला आहे.

व्हायरल व्हिडीओत नेमकं काय?

व्हायरल व्हिडिओमध्ये अरविंद केजरीवाल एका जाहीर सभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदींना आव्हान देताना ऐकू येत आहे. अरविंद केजरीवाल म्हणत आहेत की, "मोदीजी या जन्मात तुम्ही दिल्लीत आम आदमी पार्टीला हरवू शकत नाही. तुम्हाला दुसरा जन्म घ्यावा लागेल. आम आदमी पार्टी वरिष्ठ नेत्यांना अटक करुन आप आणि दिल्ली सरकारला बिथरून टाकण्याचा त्यांचा उद्देश आहे. अशा प्रकारे नरेंद्र मोदीजींना दिल्लीत सरकार बनवायचे आहे. निवडणुकीत पराभूत होऊ शकत नाही हे त्यांना माहीत आहे, त्यामुळे मी त्यांना सांगू इच्छितो की, त्यांनी केजरीवाल यांना तुरुंगात टाकले तरी तुरुंगातूनही आम आदमी पक्षाचे सरकार जिंकेल."

(नक्की वाचा-  Election Results 2025 LIVE Updates: "विकास आणि सुशासन जिंकलं", दिल्लीतील विजयावर PM नरेंद्र मोदींची प्रतिक्रिया)

भाजपचं 27 वर्षांनी कमबॅक

भाजपने दिल्ली विधानसभा निवडणुकीत विजय मिळवत 27 वर्षांनी कमबॅक केलं आहे. 70 विधानसभा जागा असलेल्या दिल्लीत पूर्ण बहुमतासाठी ३६ जागा आवश्यक आहेत. भाजपने 48 जागांवर विजय मिळवत हा आकडा ओलांडला आहे. तर आम आदमी पक्षाला 22 जागांवर समाधान मानावे लागले आहे. 

( नक्की वाचा :  Delhi Election Result : 'त्यांचे शॉर्टसर्किट केले....' दिल्लीतील विजयानंतर PM मोदींना दिली 'ही' गॅरंटी )

आपच्या अंतांची ही सुरुवात : प्रशांत भूषण

आपचे संस्थापक सदस्य प्रशांत भूषण यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला आहे. दिल्लीतील आपच्या पराभवासाठी केजरीवाल हे मोठ्या प्रमाणात जबाबदार आहेत. ज्यांनी लोकपालची मागणी केली नाही आणि स्वतःच्या लोकपालाला हटवलं. त्यांनी स्वतःसाठी 45 कोटी रुपयांचा शीशमहाल बांधला आणि आलिशान गाड्यांमध्ये फिरू लागले. 'आप'ने स्थापन केलेल्या तज्ज्ञ समित्यांच्या ३३ तपशीलवार धोरण अहवालांना त्यांनी केराची टोपली दाखवली आणि वेळ आल्यावर पक्ष योग्य धोरणे स्वीकारेल असं सांगितलं. त्यांचा असा विश्वास होता की राजकारण फक्त दिखावा आणि प्रचाराद्वारेच करता येते. ही 'आप'च्या अंताची सुरुवात आहे, असही प्रशांत भूषण यांनी म्हटलं.     

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Arvind Kejriwal, AAP, Delhi Election Result, Delhi Eelction Results News, अरविंद केजरीवाल, नरेंद्र मोदी