जाहिरात
Story ProgressBack

एग्झिट पोल्समध्ये देशाची गॅरेंटी कुणाला? कोणत्या राज्यात किती जागा, पाहा संपूर्ण यादी

लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला 400 पार चा नारा एग्झिट पोल्सनुसार प्रत्यक्षात येताना दिसत नाही.

Read Time: 2 mins
नवी दिल्ली:

लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वी विविध संस्थांकडून एग्झिट पोल्स समोर आले आहेत. एग्झिट पोल्समध्ये एनडीएला 353 ते 415  जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. एग्झिट पोल्सनुसार दहा वर्षांनंतरही पंतप्रधान नरेंद्र मोदींची लाट कायम राहील. याचा परिणाम म्हणजे 2019 मधील एनडीएचा 350 हा आकडा पार करतील, असा अंदाज आहे. 

एग्झिट पोल्सचा एकत्रित परिणाम पोल ऑफ पोल्सनुसार, एनडीए 365 पर्यंत पोहोचू शकतं. या अंदाजानुसार, भाजप पूर्व आणि दक्षिणेत आपलं अस्तित्व प्रस्थापित करेल. बंगालमध्ये भाजपला अधिक जागा मिळू शकतात. भाजपला येथे 19 ते 31 जागा मिळू शकतात. मात्र उत्तरेत त्यांना 2019 च्या तुलनेत नुकसान होऊ शकतं. दिल्ली, राजस्थान, बिहारमध्ये भाजपची संख्या कमी होण्याची शक्यता आहे. 

एग्झिट पोल्सच्या अंदाजानुसार, निवडणुकीदरम्यान पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्या पूर्व आणि दक्षिणेत भाजप मजबूतपणे वाढ होण्याची शक्यता वाढली आहे. पोल्सनुसार, गुजरात, राजस्थान, दिल्ली, मध्यप्रदेश, कर्नाटकमध्ये झालेली भाजपची घट पूर्व आणि दक्षिणेतून पूर्ण होईल. आंध्रप्रदेशात चंद्रबाबू नायडू आणि पवन कल्याण यांच्यासोबत भाजपची मैत्री सुपरहिट होत असल्याचं दिसत आहे.  

मात्र महाराष्ट्रात महायुती सर्वात जास्त टक्कर पाहायला मिळत आहे. भाजप-शिंदें यांची जोडी आणि उद्धव ठाकरेंमध्ये चुरस आहे.  2019 मध्ये 48 पैकी 41 जागांवर वर्चस्व मिळवणाऱ्या एनडीएची संख्या अर्ध्यावर पोहोचू शकते. पोल्सनुसार एनडीए यंदा 22 ते 38 पर्यंत घसरू शकते. एग्झिट पोल्सचे निकाल किती खरे होतील हे चार जून रोजी समोर येईल. जाणून घेऊया इतर राज्यांमध्ये काय आहे कल...

UP Exit Poll: उत्तर प्रदेशात भाजपला 2019 पेक्षा जास्त जागा  

यूपी (80 जागा)भाजप+I.N.D.I.Aअन्य
एक्सिस-इंडिया टुडे64-678-120-1
सीवोटर-एबीपी62-665-17-
ईटीजी-टाइम्स नाऊ69110
मेट्रिज-रिपब्लिक भारत69-746-110
चाणक्य-न्यूज 2461-756-180

Bihar Exit Poll News: बिहारमध्ये एनडीएच्या जागा घटतील 

बिहार (40 जागा)भाजप+I.N.D.I.Aअन्य
एक्सिस-इंडिया टुडे29-337-100-2
सीवोटर-एबीपी34-383-5-
ईटीजी-टाइम्स नाऊ3181
मेट्रिज-रिपब्लिक भारत32-372-70-1
चाणक्य-न्यूज 2432-400-80-1

Exit Poll 2024 West Bengal: बंगालमध्ये ममता बॅनर्जींना भाजप देणार झटका? 

पश्चिम बंगाल (42 जागा)भाजप+I.N.D.I.Aअन्य
एक्सिस-इंडिया टुडे26-3111-140-2
सीवोटर-एबीपी23-2713-171-3
ईटीजी-टाइम्स नाऊ21201
मेट्रिज-रिपब्लिक भारत21-2516-200-1
चाणक्य-न्यूज 2419-2912-220-2

महाराष्ट्राचा EXIT POLL

महाराष्ट्र (48 जागा)भाजप+I.N.D.I.Aअन्य
एक्सिस-इंडिया टुडे28-3216-200-2
सीवोटर-एबीपी22-2623-25-
ईटीजी-टाइम्स नाऊ26220
मेट्रिज-रिपब्लिक भारत30-3613-190
चाणक्य-न्यूज 2428-3810-200

तमिलनाडूमध्ये भाजपला धक्का

तमिलनाडु (39 जागा)भाजप+I.N.D.I.Aअन्य
एक्सिस-इंडिया टुडे2-433-370-2
सीवोटर-एबीपी0-237-39-
ईटीजी-टाइम्स नाऊ3342
मेट्रिज-रिपब्लिक भारत0-335-380-1
चाणक्य-न्यूज 246-1424-330-2

कर्नाटकाचे EXIT POLL

कर्नाटक (28 जागा)भाजप+I.N.D.I.Aअन्य
एक्सिस-इंडिया टुडे23-253-5-
सीवोटर-एबीपी23-253-5-
ईटीजी-टाइम्स नाऊ2350
मेट्रिज-रिपब्लिक भारत19-235-80
चाणक्य-न्यूज 2420-280-80

गुजरातचा EXIT POLL

गुजरात (26 जागा)भाजप+I.N.D.I.Aअन्य
एक्सिस-इंडिया टुडे25-260-10
सीवोटर-एबीपी25-260-10
ईटीजी-टाइम्स नाऊ2600
मेट्रिज-रिपब्लिक भारत24-260-20
चाणक्य-न्यूज 2424-260-20

EXIT POLL: राजस्थानात भाजपचं नुकसान?

राजस्थान (25 जागा)भाजप+I.N.D.I.Aअन्य
एक्सिस-इंडिया टुडे16-195-71-2
सीवोटर-एबीपी21-232-4-
ईटीजी-टाइम्स नाऊ1870
मेट्रिज-रिपब्लिक भारत22-240-30-1
चाणक्य-न्यूज 2419-250-40-2

आंध्रप्रदेशात TDP-BJP-जनसेनाची लहर

आंध्र प्रदेश (25 जागा)भाजप+I.N.D.I.Aअन्य
एक्सिस-इंडिया टुडे21-2302-4
सीवोटर-एबीपी21-2500-4
ईटीजी-टाइम्स नाऊ11014
मेट्रिज-रिपब्लिक भारत19-2203-6
चाणक्य-न्यूज 2419-2500-6

ओडिशाचे EXIT POLL

ओडिशा (21 जागा)भाजप+I.N.D.I.Aअन्य
एक्सिस-इंडिया टुडे18-200-10-2
सीवोटर-एबीपी17-190-21-3
ईटीजी-टाइम्स नाऊ1308
मेट्रिज-रिपब्लिक भारत9-120-17-10
चाणक्य-न्यूज 2413-192-60-2

केरळचे EXIT POLL

केरल (20 जागा)भाजप+I.N.D.I.Aअन्य
एक्सिस-इंडिया टुडे2-317-190
सीवोटर-एबीपी1-317-190
ईटीजी-टाइम्स नाऊ1190
मेट्रिज-रिपब्लिक भारत0-116-200
चाणक्य-न्यूज 241-712-190

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Switch To Dark/Light Mode
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination
Previous Article
अरूणाचल प्रदेश आणि सिक्कीममध्ये कोणाचं सरकार? विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू
एग्झिट पोल्समध्ये देशाची गॅरेंटी कुणाला? कोणत्या राज्यात किती जागा, पाहा संपूर्ण यादी
Will Naresh Mhaske win the Thana Lok Sabha or will Thackeray's Rajan Vichae win
Next Article
ठाणे शिवसेनेचे खणखणीत नाणे! ठाणेकरांचा कौल कोणत्या शिवसेनेला?
;